बारामती, ता. २३ : दोन लाख लोकसंख्या असलेल्या बारामती शहरात वाहतूक पोलिसांच्या कमतरतेमुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. सुसज्ज कार्यालय आणि वाहने असूनही वरिष्ठांकडून पुरेसे मनुष्यबळ मिळत नसल्याने बारामतीतील नागरिक वाहतूक समस्येमुळे त्रस्त झाले आहेत.
शहराचे वाढते नागरीकरण आणि वाहनांच्या संख्येमुळे वाहतुकीवर मोठा ताण येत आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहतूक पोलिसांसाठी सुसज्ज कार्यालय उभारले असले, तरी सध्या चौकाचौकांत पोलिसांचा अभाव दिसून येत आहे. सध्या केवळ दोन अधिकारी आणि नऊ कर्मचारी कागदावर असून, प्रत्यक्षात रजा आणि इतर कामांमुळे केवळ दोन-तीन कर्मचारीच रस्त्यावर उपलब्ध असतात. परिणामी, नगरपरिषदेच्या सुरक्षा रक्षकांवरच वाहतुकीची भिस्त अवलंबून आहे.
समन्वयाचा अभाव
दुसरीकडे, आरटीओ कार्यालयाचा वाहतूक नियमनासाठी कोणताही उपयोग होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. आरटीओ अधिकारी केवळ कागदोपत्री जबाबदारी ढकलत असून, प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून शिस्त लावण्यास ते असमर्थ ठरत आहेत. वाहतूक पोलिस आणि आरटीओ यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने अस्ताव्यस्त पार्किंग आणि वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर बनली आहे. प्रशासनाने तातडीने फिरती पथके आणि अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.