पुणे

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार; आरोपीला २० वर्षे कारावास

CD

बारामती, ता. २५ : अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी मयूर पांडुरंग फडके (रा. कानगाव, ता. दौंड, जि. पुणे) यास बारामती येथील जिल्हा न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
जिल्हा न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी हा निकाल दिला. न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावास व २० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने साधी कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच, पोक्सो कायद्यान्वये १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास २ महिने साधी कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात आरोपीने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीवर राहत्या घरी वेळोवेळी अत्याचार केले. तसेच, घटनेबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याने फिर्याद देण्यास विलंब झाला होता. नंतर पीडितेने आई-वडिलांना प्रकार सांगितल्यानंतर यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधिकारी केशव वाबळे यांनी केला.
सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील कमलाकर शंकरराव नवले यांनी काम पाहत १० साक्षीदार तपासले. पीडित मुलीने न्यायालयात दिलेली ठाम साक्ष, तसेच वैद्यकीय व परिस्थितीजन्य पुरावे महत्त्वाचे ठरले. न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीस दोषी ठरवून शिक्षा सुनावली.
या खटल्यात पोलिस निरीक्षक नारायण देशमुख, पीएसआय गोरख कसपटे, पोलिस हवालदार वेणुनाथ ढोपरे, तसेच सरकारी अभियोक्ता कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

केकेआरचे १८ कोटी पाण्यात? दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज मैदानाबाहेर, चाहत्यांची वाढली धडधड, नेमकं काय घडलं ?

आज संपतोय Amazon Summer Sale, फक्त 99 रुपयांपासून मिळतायत वस्तू..सर्व ऑफर्स पाहा एका क्लिकवर

"आम्ही एकत्र सिनेमा बघायला जाणार होतो त्यापूर्वीच" राजा शिवाजी फेम अभिनेत्रीला पितृशोक; म्हणाली..

SCROLL FOR NEXT