बारामती, ता. ४ : देशाच्या राजकीय पटलावर राजकीय पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामतीत सन १९६२ नंतर प्रथमच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रुपाने महिला आमदार निवडून गेल्या आहेत.
बारामती विधानसभा मतदारसंघावर सन १९६७पासून कायमच ज्येष्ठ नेते शरद पवार व दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्विवाद वर्चस्व राहिलेले आहे. त्यांच्या अगोदरच्या निवडणुकीत मालतीबाई शिरोळे या बारामतीतून विधानसभेवर निवडून गेल्या होत्या. त्यानंतर कायमच शरद पवार व अजित पवार निवडून गेले.
अजित पवार यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांची उमेदवारी महायुतीच्या वतीने जाहीर झाली. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी त्यांना पाठिंबा दिल्याने व त्यांच्या विरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय दिल्याने सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित होता. ऐतिहासिक मताधिक्याने त्यांचा झालेला विजय हा बारामतीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदविला जाणार आहे. त्यांच्या विजयामुळे तब्बल ६४ वर्षांच्या कालखंडानंतर बारामतीत महिला लोकप्रतिनिधी विजयी झाल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.