Thalapathy Vijay : थलपती विजयची ऐतिहासिक विजयाकडे कूच अन् Jofra Archer च्या जुन्या ट्विटचा इंटरनेटवर धुमाकूळ

Thalapathy Vijay Tamil Nadu election landslide win details: थलपती विजय सध्या तामिळनाडूच्या राजकारणात मोठा प्रभाव निर्माण करताना दिसत आहे. निवडणुकीत त्यांचा संभाव्य ऐतिहासिक विजय चर्चेत असतानाच एक वेगळीच गोष्ट इंटरनेटवर ट्रेंड होत आहे. ती म्हणजे Jofra Archer याचं जुनं ट्विट!
Thalapathy Vijay’s political rise grabs headlines as Jofra Archer’s old tweet

Thalapathy Vijay’s political rise grabs headlines as Jofra Archer’s old tweet

esakal

Updated on

Why Jofra Archer tweet is trending again Vijay politics? तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अभिनेता थलपती विजयच्या Tamilaga Vettri Kazhagam पक्षाने अनपेक्षित मुसंडी मारली आणि विजय आता इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर येऊन उभा आहे. अधिकृत निकाल अद्याप जाहीर व्हायचे असले तरी, ट्रेंडनुसार तामिळगा वेट्री कळघम (TVK), तामिळनाडूमध्ये AIADMK आणि DMK यांचे वर्चस्व संपुष्टात आणून सरकार स्थापन करू शकतो. ही बातमी लिहीत असताना, २३४ जागांच्या मतदारसंघात विजय यांचा पक्ष १०९ जागांवर आघाडीवर होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com