चाकण, ता. ३० : निघोजे (ता. खेड) येथे एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडछाड व तिचा विनयभंग करून तिला दुचाकीवरून पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीवर पॉस्को कायद्यानुसार, तसेच विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. याप्रकरणी प्रसाद ज्ञानेश्वर कुंभार (वय ३५, रा. वीर, ता. पुरंदर, सध्या रा. काळेवाडी) याला अटक केली आहे, अशी माहिती महाळुंगे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गीते यांनी दिली.
फिर्यादी महिला यांची दहा वर्षे वयाची अल्पवयीन मुलगी तिच्या दहा वर्षे वयाच्या मैत्रिणीला तिच्या घरी सोडून परत येत होती. त्यावेळी निघोजे गावातील एका घराजवळील मोकळ्या जागेत एक अनोळखी व्यक्ती त्याच्या दुचाकी वरून तेथे आला. त्याने अल्पवयीन मुलीचा हात जबरदस्तीने पकडून त्याच्याजवळ ओढून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तसेच, तिला पळवून नेण्याच्या उद्देशाने त्याच्या दुचाकीवर उचलून बसविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अल्पवयीन मुलगी जोरात ओरडली व आरोपीला धक्का मारला. त्यामुळे आरोपी मुलीला सोडून पळून गेला आहे. हा प्रकार बुधवारी (ता. २८) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.