पुणे

चाकणला स्वच्छतागृह दाखवा अन् पैसे मिळवा

CD

चाकण, ता. ४ : चाकण नगरपरिषदेच्या हद्दीतील मुख्य चौकात माणिक चौक, आंबेठाण चौक, तळेगाव चौक या मुख्य चौकात स्वच्छतागृह दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
चाकण नगरपरिषदेच्या हद्दीत सुमारे दीड लाख लोकसंख्या आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा असते. नागरिकांना मुख्य चौकात स्वच्छतागृह कोठेच मिळत नाही.ज्येष्ठ नागरिकांना विधीला जायचे असेल तर स्वच्छतागृह शोधावी लागतात. परंतु, नगरपरिषदेचे स्वच्छतागृह या चौकात कोठेच नाही. त्यामुळे विधीला कोठे जायचे हा प्रश्न अनेकांना पडतो आहे.
नगरपरिषदेच्या हद्दीत दररोज रस्त्यावर पंचवीस ते पन्नास हजार नागरिक ये-जा करतात. स्वच्छतागृह नसल्यामुळे या नागरिकांची फार पंचाईत होते. गेली अनेक वर्ष स्वच्छतागृह, शौचालयगृह कोठेच नाही. नगरपरिषद नागरिकांच्या सुविधेसाठी स्वच्छतागृह उभारत नाही. वर्दळीच्या माणिक चौकात, आंबेठाण चौकात, तळेगाव चौकात ही स्वच्छतागृहे नगरपरिषदेची असणे गरजेचे आहे. परंतु, नगरपरिषद काहीच करत नाही. नगरपरिषदेच्या हद्दीतील अतिक्रमणे वाढत आहेत. नगरपरिषदेचे अधिकारी याकडे का दुर्लक्ष करतात, असा नागरिकांचा आरोप आहे.
चाकण शहरात नगरपरिषदेची एकवीस स्वच्छतागृह आहेत. नगर परिषदेने बीओटी तत्त्वावर शहरात मुख्य चौकामध्ये स्वच्छतागृह बांधणे गरजेचे आहे. नागरिकांच्या आरोग्याकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष आहे. नगरपरिषदेने या प्राथमिक मूलभूत सुविधा नागरिकांना देणे गरजेचे आहे. पण याकडे मात्र कोणाचेच लक्ष नाही हे भयानक वास्तव आहे.

‘स्वच्छतागृह बांधू’
याबाबत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले म्हणाले, ‘‘ही समस्या बरोबर आहे. मी नुकताच पदभार सांभाळलेला आहे. मुख्य चौकात वर्दळीच्या ठिकाणी नगरपरिषदेच्यावतीने स्वच्छतागृह बांधण्यात येतील.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाणी समजून टरपेंटाईन पिलं, दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; नागपूरमधील घटना

Gadchiroli News: उघड्यावर असलेले धान उचलणार कधी?; दुर्लक्षामुळे धान्याची नासाडी; दोन लाख ३८ हजार ५४९ क्विंटल धानाची उचल नाहीच

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

Global Economy: युद्धामुळे इंधन, खतांचे दर दीर्घकाळ चढेच राहणार; IMF आणि जागतिक बँकेचा इशारा!

IPL, CSK vs KKR: अजिंक्य रहाणे दुहेरी कात्रीत सापडला; आधी कोलकाताने मॅच हरली, नंतर BCCI ने कारवाई केली; नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT