पुणे

कंपनीचे नुकसान केल्याप्रकरणी भांबोलीतील ५ जणांना अटक

CD

चाकण, ता. ३ : येथील औद्योगिक वसाहतीतील भांबोली (ता. खेड) येथील कोरल लॉजिस्टिक्स असेस्ट इंडिया प्रा. लिमिटेड कंपनीच्या आवारात कंपनीची सुरक्षाभिंत, तसेच रस्त्याचे व एमएनजीएल गॅस वाहिनीचे नुकसान केल्याप्रकरणी कंपनीच्या वतीने पोलिसात फिर्याद दिल्यानंतर आरोपी चैतन्य सयाजी वाडेकर (वय २९), अमोल सयाजी वाडेकर (वय ३१), प्रमोद सयाजी वाडेकर (वय ३३, तिघेही रा. भांबोली) व इतर दोघे अशा पाच जणांना अटक केली आहे. आरोपी वाडेकर व इतर अनोळखी दहा ते पंधरा साथीदार यांच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती महाळुंगे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गीते यांनी दिली. दरम्यान, गुन्हा दाखल झालेले चैतन्य वाडेकर हे युवा कीर्तनकार म्हणून ओळखले जातात.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार बुधवारी (ता. २) रात्री दोन ते पहाटे पावणेचारच्या दरम्यान घडला. पोलिसांत फिर्याद कंपनीच्या वतीने अजित पाटील (सध्या रा. चिंचवड) यांनी दिली. फिर्यादीच्या कंपनीच्या लगत आरोपी वाडेकर यांची इमारत आहे. आरोपी तसेच इतरांनी कायदा गर्दी जमाव जमविला. जेसीबी व पोकलेनच्या साह्याने कंपनीच्या गेटमध्ये अनाधिकृतपणे प्रवेश केला व कंपनीची पूर्व दिशेला असलेली सुरक्षा भिंत, तसेच उत्तर दिशेला असलेली सुरक्षा भिंत पूर्णपणे पाडून नुकसान केले. चाकण- आंबेठाण रस्त्यावरून कंपनीकडे जाणारा रस्ता जेसीबी व पोकलेनच्या साह्याने खोदला. त्यावर मोठमोठे खड्डे पाडले. जलवाहिनी फोडली. विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिन्या तोडल्या. निष्काळजीपणे नुकसान केले. तसेच, एमएनजीएलची गॅस वाहिनी तोडली. त्यामुळे गॅस गळती होऊन कंपनीच्या आवारात व लगतच्या परिसरात गॅस पसरला व लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk ED Inquiry : 'गोकुळमध्ये विश्वास पाटील, अरूण डोंगळेंची ईडी चौकशी होणार', मंत्री मुश्रीफांची अडचण वाढणार; आमदार शिवाजी पाटलांची टीका

Pune: जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा;आंबेगावात सर्वाधिक टंचाई; टँकरचा ८९ हजार नागरिकांना आधार

Maharashtra Din 2026: महाराष्ट्र दिन अन् कामगार दिन दोन्ही 1 मे रोजीच का साजरे केले जातात? जाणून घ्या एकाच क्लिकवर

Commercial LPG Price Hike : निवडणुका संपताच सामान्यांना झटका! एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल १ हजारांची वाढ, काय आहे तुमच्या शहरातील ताजा दर?

Mumbai: विधान परिषद निवडणूक बिनविरोध?; दहा जागांसाठी दहा अर्ज; महाविकास आघाडीत अखेर एकमत

SCROLL FOR NEXT