पुणे

चाकण येथे कांद्याची ९०० क्विंटल आवक

CD

चाकण, ता. १७ : चाकण (ता. खेड) येथील महात्मा फुले बाजारात रविवारी (ता.१७) कांद्याची नऊशे क्विंटल आवक झाली. प्रतवारीनुसार
कांद्यास प्रतिकिलोला साठ रुपये बाजारभाव मिळाला. हाच कांदा किरकोळ बाजारात प्रतिकिलो सुमारे ८० रुपयांनी विकला गेला. टोमॅटोची चाळीस टन आवक झाली. इतर पालेभाजांचे बाजाभार स्थिर आहे. कोथिंबिरीची आवक घटली असून, सुमारे पन्नास हजार जुड्यांची आवक झाली.

बाजारात टोमॅटोची चाळीस टन आवक झाली.त्यास प्रतिकिलोस प्रतिकिलोस वीस ते तीस रुपये बाजारभाव मिळाला. लसणाची फक्त वीस क्विंटल आवक झाली. घाऊक बाजारात त्यास प्रतिकिलो ३२० रुपये बाजारभाव मिळाला, अशी माहिती खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय शिंदे, सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली.

बाजारात बुलडाणा, नंदुरबार जिल्ह्यातून हिरव्या मिरचीची सुमारे चाळीस टनांवर आवक झाली. हिरवी मिरची घाऊक बाजारात २० ते ४० रुपये प्रतिकिलोने विकली जात आहे. टोमॅटोची आवक सातारा, अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यातून होत आहे. बटाट्याची आवक अडीच हजार क्विंटल झाली. बटाट्याला प्रतिकिलोला सुमारे २५ ते ३८ रुपये बाजारभाव मिळाला. बाजारात इंदोर, आग्रा येथून बटाट्याची आवक होत आहे. बटाट्याला मोठी मागणी आहे.


फळभाज्यांचे प्रतिकिलोचे बाजारभाव पुढीलप्रमाणे : हिरवी मिरची- २० ते ४०, परवल -५०, हिरवा वाटाणा-८० ते १००, भेंडी-४५ ते ५५, टोमॅटो-२० ते ३०, गवार- ५० ते ८० , फ्लॉवर २० ते २५, कोबी १८ ते २८, दुधी भोपळा १० ते २०, राजमा वाल -१००, चवळी- ३० ते ४०, शेवगा - ५० ते ७०, ढोबळी मिरची- ५० ते ७०, आद्रक- ८० ते १००, दोडका-४० ते ५०, वांगी -४५ ते ५५, काकडी -१० ते १५.

कोथिंबीर मेथीच्या ५० हजार जुड्यांची आवक
कोथिंबीर, मेथीच्या सुमारे पन्नास हजार जुड्यांची आवक झाली. एका जुडीला पाच रुपये ते दहा रुपये राहिले. मेथीची एक जुडी १८ ते २८ रुपयाला विकली गेली. कोथिंबिरीची एक जुडी पाच ते दहा रुपयाला विकली गेली. शेपूची एक जुडी १० ते १५ रुपयाला विकली गेली. पालकच्या तीन हजार जुड्यांची आवक झाली. एक जुडी दहा ते पंधरा रुपयाला विकली गेली.


07672

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Income Tax: 1 एप्रिलपासून नवा Income Tax नियम! पगार, घर-गाडी, गिफ्ट, PF वर आता आकारला जाणार कर; जाणून घ्या 7 मोठे बदल

Latest Marathi News Live Update : झोजी ला खिंडीत जोरदार हिमवृष्टी

Tejaswini Sangale Death : सुवर्णपदक विजेती खेळाडू मृत्यूशी झुंज हारली! राष्ट्रीय खो-खो पटू तेजस्विनी सनगलेचे वयाच्या 18 व्या वर्षी निधन, अपघातात मेंदूला...

Solapur LPG Misuse: साेलापूरात घरगुती गॅस वापरणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे; अन्नधान्य वितरण विभागाचे छापे, हॉटेल व्यावसायिक रडारवर!

USA Drone Threat: अमेरिकेच्या मंत्र्यांच्या घरावर ड्रोन; लष्करी तळावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, 'एफबीआय’चा काय इशारा!

SCROLL FOR NEXT