चाकण, ता. ४ : येथील नगर परिषदेचा सन २०२५- २६चा १६४ कोटी ८८ लाख जमाखर्चाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी कोणतीही करवाढ न करता मंजूर केली.
चाकण (ता. खेड) येथील नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी सन २०२४-२५ या वित्तीय वर्षाच्या सुधारित अर्थसंकल्पासह सन २०२५- २६ या वित्तीय वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही. यात नियमानुसार महिला बालकल्याण, दिव्यांग, दुर्बल घटक, तसेच क्रीडा व कला महोत्सव यासाठी विशेष राखीव निधीची तरतूद केली आहे, अशी माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी दिली.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना राज्यस्तरांतर्गत चाकण शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर असून, त्या योजनेचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामध्ये नवीन पंपिंग स्टेशन, जॅकवेल, पाणी साठवून टाक्या उभारणे, वितरण नलिका टाकणे व इतर आनुषंगिक कामे प्रस्तावित आहेत. नगरपरिषदेचा स्वहिस्सा या अनुषंगाने निधीची भरीव तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविणे, संगणकीकरण यासह नागरी सुविधा केंद्र अद्ययावत करण्याच्या अनुषंगाने तरतूद, तसेच शहराची वाढती लोकसंख्या व विस्तार विचारात घेऊन भुयारी गटार योजना, एसटीपी प्रकल्प, प्रस्तावित शहर विकास आराखडा विचारात घेऊन नवीन रस्ते, नगरपरिषदेसाठी नवीन प्रशासकीय इमारत बांधणे यासाठी आवश्यक डीपीआर व आराखडे तयार करण्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद केली आहे. शहराची वाढती लोकसंख्या व रहिवासी वस्ती लक्षात घेता पाणीपुरवठा विभाग, आरोग्य विभाग, विद्युत विभाग यासाठी दैनंदिन देखभाल व दुरुस्ती व त्या कामासाठी अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद केली आहे.
अर्थसंकल्पात जमा व खर्चाचे तपशील (रुपयांत)
जमा
- आरंभीची शिल्लक- ५३ कोटी ९७ लाख २८ हजार ३२०
- महसुली जमा- २९ कोटी ८४ लाख २१ हजार
- भांडवली जमा- ८१ कोटी ६ लाख ६७ हजार
- एकूण- ११० कोटी ९० लाख ८८ हजार
- आरंभीच्या शिल्लकेसह- १६४ कोटी ८८ लाख १६हजार ३२०
खर्च
- महसुली खर्च- ३८ कोटी २३ लाख ४९ हजार
- भांडवली खर्च- १०२ कोटी ७६ लाख २२हजार
- एकूण खर्च- १४० कोटी ९९ लाख ७१ हजार
- अखेर शिल्लक- २३ कोटी ८८ लाख ४५ हजार ३२०
- एकूण शिल्लकेसह खर्च- १६४ कोटी ८८ लाख १६ हजार ३२०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.