पुणे

चाकण बाजारात कांद्याचे बाजारभाव स्थिर

CD

चाकण , ता. ९: उन्हाचा चटका वाढल्याने बाजारात फळभाज्यांची आवक घटत आहे. रब्बी हंगामातील कांद्याची काढणी सुरू आहे. त्यामुळे चाकण (ता. खेड) येथील महात्मा फुले बाजार आवारात रविवारी (ता.९) कांद्याची सुमारे १४ हजार क्विंटलची आवक झाली. मात्र, त्याचे बाजारभाव स्थिरच आहेत. कांद्याला प्रतिकिलोला किमान १८ रुपये तर कमाल २३ रुपये भाव मिळाला. भावात सुमारे दहा ते बारा रुपयांनी घसरण झाली आहे.
बाजारात हिरव्या वाटाण्याची मध्यप्रदेश व राजस्थान राज्यातून आवक झाली. त्यास घाऊक बाजारात प्रतिकिलोला चाळीस ते पंचेचाळीस रुपये बाजारभाव मिळाला. हिरव्या वाटाण्याचे भाव प्रतिकिलोला वीस रुपयांनी वाढले आहेत. टोमॅटोला घाऊक बाजारात प्रतिकिलोला आठ ते बारा रुपये बाजारभाव मिळाला. बुलडाणा, नंदुरबार जिल्ह्यातून हिरव्या मिरचीची सुमारे पन्नास टन आवक झाली, अशी माहिती खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय शिंदे, उपसभापती क्रांती सोमवंशी,सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली.

लसणाची तीस क्विंटल आवक झाली.घाऊक बाजारात त्यास साठ ते शंभर रुपये प्रतिकिलोने बाजारभाव मिळाला. बटाट्याची आवक दीड हजार क्विंटल झाली. बटाट्याला प्रतिकिलोला बारा ते वीस रुपये बाजारभाव मिळाला. बाजारात इंदोर, आग्रा येथून बटाट्याची आवक होत आहे तसेच स्थानिक काढणी केलेल्या नवीन बटाट्याची काही आवक होत आहे.

फळभाज्यांचे प्रतिकिलोचे बाजारभाव : हिरवी मिरची- ४० ते ६०, हिरवा वाटाणा-४० ते ४५, भेंडी-३० ते ४०, टोमॅटो-८ ते १२, गवार - ५० ते ७०, फ्लॉवर ४ ते ८, राजमा वाल -३० ते ४०, तुरमुड्या वाल-४० ते ५०, चवळी-२० ते ३०, शेवगा- ३० ते ५०, ढोबळी मिरची- २० ते ४०, आद्रक- ३० ते ४०, तोंडले -३०, काकडी -१० ते २०, गाजर १०ते १५, कारली ३० ते ४.


पालकच्या चार हजार जुड्यांची आवक
बाजारात कोथिंबीर, मेथीच्या सुमारे पन्नास हजारावर जुड्यांची आवक झाली. मेथीची एक जुडी पाच ते दहा रुपयाला विकली गेली. कोथिंबिरीची एक जुडी सहा ते दहा रुपयाला विकली गेली.शेपूची एक जुडी सहा ते आठ रुपयाला विकली गेली. पालकच्या चार हजार जुड्यांची आवक झाली. एक जुडी चार ते पाच रुपयाला विकली गेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT