पुणे

चाकण मार्गावरील दोन पूल त्वरित पाडा

CD

चाकण, ता. २३ : येथील पुणे-नाशिक महामार्गावरील नाणेकरवाडी फाटा, तळेगाव चौकाजवळील, तसेच आंबेठाण चौकाजवळील दोन्ही भराव मार्ग पूल पाडावेत. दोन्ही पूल वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. पुणे-नाशिक महामार्गाचे काम जेव्हा होईल तेव्हा होईल, परंतु हे पूल चुकीचे आहेत, ते पाडलेच पाहिजेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कांडगे व नागरिकांनी केली आहे.
चाकण (ता. खेड) येथील पुणे-नाशिक महामार्गावरील नाणेकरवाडी फाट्याजवळील, तसेच आंबेठाण चौकाजवळील दोन्ही पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने पाडावेत. शासनाने याकडे त्वरित लक्ष द्यावे. येथील मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांतील वाहतूक मोठ्या प्रमाणात कंटेनर, ट्रेलर यातून होते. या मुख्य मार्गावर अवजड वाहनांची संख्या अधिक प्रमाणात आहे. ही अवजड वाहने मुख्य रस्त्यावरून चालताना मोठ्या प्रमाणात इतर वाहनांना अडथळा ठरत आहे. त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होते. यात पावसाने रस्त्यावर साचलेले पाणी, पडलेले खड्डे, यामुळे मंदावलेली वाहतूक ही कारणे कारणीभूत आहेत. हे पूल येथे करू नयेत, यासाठी तत्कालीन बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्याकडे नागरिकांनी, व्यावसायिकांनी मागणी केली होती. परंतु त्यावेळी तरीही हे पूल झाले. हे दोन्ही पूल पाडून पुणे- नाशिक महामार्गावरील मेदनकरवाडी गावच्या हद्दीतील कन्या शाळा ते चाकण हद्दीतील हॉटेल भरत या अंतरापर्यंत उड्डाणपूल व्हावा, मागणी परिसरातून होत आहे. सुमारे दीड किलोमीटर अंतराचा उड्डाणपूल झाल्यास वाहतूक कोंडी सुटेल.
चाकण शहरातील मुख्य मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पीएमआरडीएने प्रस्तावित केलेला बाह्यवळण मार्ग लवकर करणे गरजेचे आहे. गेल्या ३० वर्षापासून हा प्रस्तावित मार्ग आहे. परंतु या मार्गाचे काम काही होत नाही. हा मार्ग झाल्यास वाहतूक कोंडी कमी होऊ शकेल. तो तत्काळ होण्याची गरज आहे, असे मेदनकरवाडीचे सरपंच अमोल साळवे, उपसरपंच महेंद्र मेदनकर, ॲड. संकेत मेदनकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITR Deadline 2026: ITR भरण्यासाठी फक्त 4 दिवस शिल्लक! 31 जुलैची मुदत चुकल्यास दंडासह 'हे' मोठे नुकसान होऊ शकते

"मी काय करावे, हे मला कुणीही सांगू शकत नाही!" Sanju Samson चं धाडसी विधान; गौतम गंभीरला अप्रत्यक्ष इशारा? नेमकं काय म्हणाला?

'जळत्या सिगारेटचा चटका अन् वाटेल तिथं स्पर्श...' अभिनेत्रीनं सांगितला सर्वात वाईट अनुभव, म्हणाली...

Kalyan News: कल्याणमध्ये मद्यधुंद तरुणाचा पोलिसावर हल्ला, काठीने जबर मारहाण; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

Latest Marathi News Live Update : NEET आंदोलनावर पोलिसांच्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव; RJD खासदार मनोज कुमार झा यांची याचिका

SCROLL FOR NEXT