पुणे

ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या अध्यक्षपदी खांडेभराड

CD

चाकण, ता. २४ : शेलपिंपळगाव (ता. खेड) येथील आमदार दिलीपराव मोहिते पाटील ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मनोज खांडेभराड, उपाध्यक्षपदी संतोष साबळे तसेच सचिवपदी शंकरराव रघुनाथ मोहिते यांची बिनविरोध निवड झाली आहे. याबाबत खांडेभराड, मोहिते यांनी माहिती दिली.
राजगुरुनगर (ता. खेड) येथे बाजार समितीच्या सभागृहात ही निवड करण्यात आली. अध्यक्ष, उपाध्यक्षपदी एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने खांडेभराड व साबळे यांची निवडणूक बिनविरोध झाली असे निवडणूक निर्णय अधिकारी एस. एम. बगाटे यांनी जाहीर केले. यावेळी संस्थेचे संस्थापक सतीश मोहिते, संचालक संदीप पोटवडे, कालिदास दौंडकर, संजय दिघे, दिगंबर लोणारी, भगवान खैरे, सुरेखा दौंडकर, वृषाली साबळे, व्यवस्थापक सागर आवटे, सहव्यवस्थापक संजय मोहिते आदी उपस्थित होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच इतर पदाधिकाऱ्यांचा सत्कार माजी आमदार दिलीप मोहिते व माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा मोहिते यांच्या हस्ते करण्यात आला. संस्थेचे शेतकरी सभासद व इतर सभासद वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असून शेतकरी, कामगार, बेरोजगार तरुणांना उद्योगधंद्यासाठी तसेच महिलांच्या सबलीकरणासाठी कर्ज पुरवठा करण्यावर विशेष भर देणार असल्याचे खांडेभराड यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Slab: पंतप्रधानांच्या घोषणेनंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये! जीएसटीमध्ये मोठा बदल होणार, प्रस्तावही पाठवला, काय स्वस्त होणार?

Nizamuddin Dargah: निजामुद्दीन दर्गा परिसरात मोठा अपघात; छत कोसळून ५ जणांचा मृत्यू

Dahi Handi: दहीहंडी उत्सवावर पोलिसांचे विशेष लक्ष, शहरात कडेकोट बंदोबस्त; कशी असेल सुरक्षा?

Raigad News: चिंता मिटली, धरणे भरली! रायगड जिल्ह्यातील धरणांमध्ये 95 टक्के जलसाठा

Latest Marathi News Live Updates: UPSC ची तयारी करणाऱ्या तरुणावर अ‍ॅसिड हल्ला, मारहाणीनंतर जंगलात फेकलं

SCROLL FOR NEXT