पुणे

चाकणमध्ये ट्रॅफिक मुक्तीची घोषणा

CD

चाकण, ता. १३: येथील चाकण तळेगाव,चाकण शिक्रापूर, पुणे नाशिक महामार्गावर होत असलेल्या वाहतूक कोंडीबाबत त्याबाबत मार्गाची सुधारणा , उपाययोजना करण्यासाठी कृती समितीच्या वतीने तसेच नागरिकांच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती.
चाकण (ता. खेड) येथील औद्योगिक वसाहतीत तसेच मुख्यमार्ग पुणे नाशिक, चाकण तळेगाव, चाकण शिक्रापूर मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. या कोंडीला नागरिक, उद्योजक, कामगार, प्रवासी सारेच कंटाळले आहेत. चाकणकर नागरिकांचा, उद्योजकांचा, कामगारांचा संयम संपत चाललेला आहे. कोंडी सोडविण्यात यावी तसेच मार्गांची कामे व्हावी या मागण्यासाठी व इतर उपयोजना काय करणार आहे यासाठी कृती समितीचे कार्यकर्ते, नागरिक, कामगार यांच्यावतीने आज बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनेकांनी वाहतूक कोंडीबाबत तसेच शासनाकडून रेंगाळलेल्या कामाबाबत विचार व्यक्त केले. या मार्गाची कामे तातडीने व्हावी अशी मागणी केली. यावेळी आमदार बाबाजी काळे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय शिंदे, प्रिया पवार, रत्नमाला भुजबळ, नागरिक कामगार आदी उपस्थित होते.
दरम्यान, बाबाजी काळे यांनी रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहे, असे आश्वासन दिले. चाकण ट्रॅफिक मुक्त झाले पाहिजे अशा उपस्थितांनी यावेळी घोषणा दिल्या. येत्या ता.१६ पासून कृती समितीच्या वतीने तसेच चाकण नागरिकांच्या वतीने पुणे - नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी समस्येचा आवाज उठवण्यासाठी, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जन आंदोलन करण्यात येणार आहे तसेच उपोषणही करण्यात येणार आहे, अशी माहिती कुणाल कड, प्रशांत टोपे, गणेश नाणेकर, लक्ष्मण जाधव, बाळासाहेब नाणेकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cruise Incident: बर्गी धरणात मोठा अपघात! ४० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले; ४ जणांचे मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता

GT vs RCB Live: विराट कोहलीने घातला राडा! रजत पाटीदारच्या विकेटवरून संतापला, जेसन होल्डरच्या झेलवरून अम्पायरसोबत वाद Video

RTE Admission Deadline Extended: आरटीई २५ टक्के राखीव प्रवेशांसाठी अंतिम मुदतवाढ; पालकांना ८ मे पर्यंत संधी

Maharashtra Private School Fee Refund: खासगी शाळांना शुल्क परतावा धोरणाच्या दिशेने एक पाऊल; प्राथमिक शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

सोलापूरच्या पोलिस दलातील ‘या’ १५ अधिकारी-अंमलदारांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह! महाराष्ट्र दिनानिमित्त आज पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव, वाचा...

SCROLL FOR NEXT