पुणे

वाहनतळाअभावी नागरिकांची गैरसोय

CD

चाकण, ता. १३ : चाकण शहरात जुना पुणे नाशिक मार्ग तसेच बसस्थानक आवारात ज्या दुचाकी लावल्या जातात. त्यांना वाहतूक पोलिस विभागाच्या वतीने टोईंग वाहनाद्वारे टोईंग केले जाते. त्यावर प्रत्येकी सातशे छत्तीस रुपये दंड आकारला जातो आणि कारवाई केली जाते. त्यामुळे नागरिक, कामगार, दुचाकी चालक सारे त्रस्त आहेत.
चाकण (ता. खेड) शहरात जुना पुणे नाशिक मार्ग तसेच चाकण बस स्थानक परिसरात बेकायदा पार्किंग करणाऱ्या वाहनांवर तीन महिन्यांपासून दंडात्मक कारवाई सुरू आहे. चाकण शहरात सम, विषम पार्किंगचे फलकही लावण्यात आले आहेत. बेकायदा पार्किंग केलेली दुचाकी वाहतूक पोलिसांच्या वतीने टोईंग केली जाते. त्यानंतर त्या दुचाकी पुणे-नाशिक महामार्गावर तळेगाव चौकात पोलिस चौकीला आणल्या जातात. तेथे दंडात्मक कारवाई झाल्यानंतर त्या पुन्हा दुचाकी मालक, चालकांना दिल्या जातात. या कारवाईमुळे नागरिक, वाहनचालक, कामगार, व्यावसायिक वैतागले आहेत. बाजारात काही खरेदी करताना दुचाकी लावायची कुठे हा प्रश्‍न आहे. नगरपरिषदेचे वाहनतळ नाही त्यामुळे दुकानासमोर मार्गावर दुचाकी लावल्या की त्या उचलल्या जातात आणि मग नागरिक, दुचाकी चालक, कामगार यांची पळापळ होते. यामध्ये चालक महिलांना मनस्ताप होतो. दंडात्मक कारवाई सातशे छत्तीस रुपये आहे. त्यामुळे गरीब, कामगारांचे हाल होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वाहनतळ चाकणमध्ये कोठेच नाही. माणिक चौकाजवळ नाणेकरवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत एसटी बस स्थानक आहे. नाणेकरवाडी ग्रामपंचायतीने वाहनतळ केलेले नाही. तसेच नगरपरिषदेनेही वाहनतळ केलेले नाही. दुचाकी चालकांना, मालकांना दंडात्मक कारवाईमुळे त्रास सहन करावा लागत आहे. सम-विषम पार्किंगचे फलक लावले तरी त्याचा काही उपयोग होत नाही. काही दुकानदार त्यांच्या दुकानांसमोर दुचाकी लावून देत नाहीत हा प्रश्‍न आहे.

नाणेकरवाडी ग्रामपंचायतीने तसेच चाकण नगरपरिषदेने स्वतंत्र वाहन तळ करावे. रस्त्यावरचा भाजीपाला बाजार जो बसतो आहे तो काढून टाकावा, हातगाडीवाले, पथारीवाले काढून टाकण्यात यावेत. त्या ठिकाणी वाहनतळ करावे. त्यामुळे दुचाकी चालक, मालक यांना दंडात्मक कारवाईचा भुर्दंड सोसावा लागणार नाही.
बाळासाहेब नाणेकर, सामाजिक कार्यकर्ते

चुकीच्या पद्धतीने समाजमाध्यमावर नगरपरिषदेची प्रतिमा मलिन करण्याचा काहीजण प्रयत्न करतात. दुचाकी टोईंग केल्यानंतर त्याच्या दंडात्मक कारवाईचा मोबदला हा वाहतूक विभागाला मिळतो, नगरपरिषदेला नाही. काही ठिकाणी अतिक्रमणे काढल्यानंतर वाहनतळ करण्यात येणार आहे. नगरपरिषदेबाबत चुकीचे काही लोकांनी विनाकारण पसरवू नये. त्यामुळे नागरिकांत संभ्रम निर्माण होतो.
डॉ. अंकुश जाधव, मुख्याधिकारी, चाकण नगरपरिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CET Exams : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्र सीईटी परीक्षा आता वर्षातून दोनदा; उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांची घोषणा

Girija Oak National Crush : न्यू नॅशनल क्रश गिरिजा ओक! निळ्या रंगाच्या साडीत असं काय आहे की, चाहत्यांना वेड लावलं?

Viral Video: सहा बायका... एकाच वेळी सर्व गर्भवती; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल, नेमकं प्रकरण काय?

Latest Marathi Breaking News : बुलढाण्यात शेतीच्या वादातून नातेवाईकांत हाणामारी,एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी

RCBला व्हावं लागणार पुणेकर? बंगळुरुतल्या चेंगराचेंगरीमुळे IPL 2026मध्ये मोठा निर्णय घेण्याची शक्यता....

SCROLL FOR NEXT