चाकण, ता. ५ : ‘‘कोणी कितीही अफवा पसरल्या, तरी मी मुख्यमंत्री असताना सुरू केलेली लाडकी बहीण योजना कदापी बंद होणार नाही. या लाडक्या बहिणींमुळे महायुतीचे २३२ आमदार निवडून आले,’’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
चाकण (ता. खेड) येथे शिवसेनेचा पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘‘शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचे पाप झालं, त्यावेळी एकनाथ शिंदेंनी उठाव केला. पन्नास आमदार एकनाथ शिंदे सोबत राहिले, ही मोठी गोष्ट आहे. चाकण येथील वाहतूक कोंडी सोडली जाणार आहे. तळेगाव- चाकण- शिक्रापूर मार्गाला मान्यता दिलेली आहे. त्या मार्गाच्या कामाचे टेंडर सुरू आहे. सुमारे पाच हजार कोटी रुपये खर्चाचे काम होणार आहे. माझी भूमिका ऑन द स्पॉट डिसिजन अशी आहे. शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला म्हणून मळमळ, जळजळ आहे. मी दिल्लीला गेलो तरी काहींना मळमळते.’’
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे उपस्थित होते.