चाकण, ता. १८ : येथील मेदनकरवाडी फाटा (ता. खेड) येथे चाकण- शिक्रापूर मार्गावर गुरुवारी (ता. १८) रात्री दहाच्या सुमारास उसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली उलटली. त्यामुळे शिक्रापूर बाजूकडून चाकणकडे येणारी वाहतूक खोळंबली. ट्रॅक्टरला पाठीमागे लावलेल्या दोन ट्रॉली उसाने भरून शिक्रापूर बाजूकडून चाकण बाजूकडे चालल्या होत्या. मेदनकरवाडी फाट्यावर अचानक पुढची ट्रॉली उलटली. त्यामुळे ऊस रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरला गेला. त्यामुळे शिक्रापूर बाजूकडून चाकण बाजूकडे येणारी वाहतूक खोळंबली होती. मार्गावर उसाचे ढीग पडले होते. ही माहिती चाकण उत्तर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांना देण्यात आली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी आले. रस्त्यावरील उसाच्या मोळ्या काही लोक घेऊन जात होते.