पुणे

Chakan Traffic Jam: वाहतुकीने चाकणकरांची पुन्हा कोंडी

Pune traffic congestion: पुणे-नाशिक महामार्ग आणि चाकण एमआयडीसीकडे जाणाऱ्या मार्गांवर रोजच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

CD

चाकण : जागतिक पातळीवरील औद्योगिक वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकण शहर व परिसरात गेल्या काही वर्षापासून वाहतूक कोंडीची समस्या बिकट बनली आहे. पुणे- नाशिक महामार्ग, चाकण-तळेगाव, चाकण-शिक्रापूर, चाकण एमआयडीसीकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गावर दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.

चाकण औद्योगिक वसाहतीतील जड वाहतूक, अपूर्ण रस्ते, प्रलंबित कामे, वाढलेली खासगी वाहनांची मोठी संख्या ही कोंडीची प्रमुख कारणे आहेत. कामगार, विद्यार्थी, रुग्णवाहिकांनाही या कोंडीचा मोठा फटका बसत आहे. स्थानिक नागरिक, कामगारांनी वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याने प्रशासनावर, नेत्यांवर नाराजी व्यक्त केली जात आहे.

वाहतूक पोलिस विभागाने सिग्नल व्यवस्था सुधारण्याचे, तसेच जड वाहनांसाठी ठरावीक वेळ निश्चित करण्याचे आश्वासन दिले आहे. उपाय म्हणून रस्ते रुंदीकरण, पर्यायी मार्गांची निर्मिती, सार्वजनिक वाहतूक बळकट करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञ तसेच उद्योजकांचे मत आहे.

उपाययोजना करण्याची मागणी

कंपन्यांमुळे चाकणमधील रस्त्यांवर ट्रक, कंटेनर, ट्रेलर, टँकर, कामगार कर्मचाऱ्यांची वाहने, बस तसेच अवैध वाहने रिक्षा मार्गावर अस्ताव्यस्त लागत असल्याने कोंडी होत आहे. स्थानिक, कामगार संघटना, उद्योजक व्यावसायिक, ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समिती यांनी एमआयडीसी, पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआयडीसी यांच्याकडे काही उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. रस्ते रुंदीकरण, सिग्नल सुधारणा, अवजड वाहनांसाठी वेळा महत्त्वाच्या आहेत. पण याकडे दुर्लक्ष होत आहे, हे वास्तव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT