पुणे

मेदनकरवाडी पंचायत गणासाठी अरुण कुसाळकर योग्य नेतृत्व

CD

चाकण, ता. ५ : ‘‘खेड तालुक्यातील मेदनकरवाडी पंचायत समिती गणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अरुण कुसाळकर आहेत. गणाच्या विकासासाठी त्यांचे नेतृत्व योग्य आहे. त्यासाठी त्यांच्या मशाल या चिन्हावर शिक्का मारून त्यांना विजयी करावे,’’ असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खेड तालुकाप्रमुख रामदास धनवटे यांनी प्रचारात केले.
ते म्हणाले, ‘‘मेदनकरवाडी, कडाचीवाडी, रासे परिसरातील प्रश्न सोडविण्यासाठी अरुण कुसाळकर यांनी कायम प्रयत्न केला आहे. कोणी समस्या सांगितली किंवा अडचण सांगितली तर त्या सोडविण्यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. त्यामुळे या उमेदवाराला जनमाणसांत वाढता पाठिंबा मिळत आहे. मतदारांचा त्यांच्यावर विश्वास आहे.’’ अरुण कुसाळकर म्हणाले, ‘‘मतदारांचा मला प्रतिसाद आहे. शेतकरी, कामगार, महिला वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे. मी निवडून आल्यानंतर या गणातील प्रलंबित विकासकामे करण्यावर भर देणार आहे.’’
दरम्यान, आमदार बाबाजी काळे म्हणाले, ‘‘अरुण कुसाळकर हा तरुण उमेदवार गरीब परिस्थितीतून वर आलेला आहे. गोरगरीब वर्गाची त्यांना जाणीव आहे. त्यांच्या मातोश्री या नाणेकरवाडीच्या सरपंच होत्या. तसेच, उमेदवार अरुण कुसाळकर व त्यांचे बंधू रामभाऊ कुसाळकर यांनी समाजासाठी काम केले आहे. विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. त्यामुळे मतदारांनी त्यांना निवडून द्यावे.’’
मेदनकरवाडीचे सरपंच अमोल साळवे, मंगेश पऱ्हाड, ज्ञानेश्वर कड, अनिकेत केदारी, श्‍यामराव कड, किरण कड, रामभाऊ कुसाळकर, प्रवीण मुंगसे, शशिकांत लष्करे, विलास मुंगसे, शुभम कड, पांडुरंग लष्करे, मयूर खांडेभराड, बजरंग कड, संतोष कड, ईश्वर कोतवाल, अनिल लष्करे, संदीप लष्करे, सागर कड, रामचंद्र कड आदी प्रचार करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आज मतदान! मोबाईल घेऊन जाऊ नका, फोटो-व्हिडिओ काढल्यास दाखल होईल गुन्हा; एकच बॅलेटवर दोन्ही उमेदवार, मतदान कसे करायचे? ‘हे’ ओळखपत्र असेल तरी करता येईल मतदान

बापरे! दिव्या शिंदेला बिग बॉसने काढलं घराबाहेर, जीवे मारण्याची दिली धमकी, नक्की काय घडलं?

उजनी धरणात 113 TMC पाणी! भीमा नदीत 15 फेब्रुवारीपर्यंत पाणी तर शेतीचे आवर्तन 28 फेब्रुवारीपर्यंत असणार; पुढे ‘या’ महिन्यात सुटणार दोनदा पाणी, वाचा...

Thalapathy Vijay News : मद्रास उच्च न्यायालयाकडून थलापती विजयला आणखी एक धक्का; दीड कोटींचा दंड भरावा लागणार

U19 World Cup: पुणेकराचं मार्गदर्शन अन् टीम इंडियाने जिंकला वर्ल्ड कप! भारतीय क्रिकेटचे भविष्य घडवणारा मराठमोळा प्रशिक्षक

SCROLL FOR NEXT