पुणे

कांदा उत्पादक कर्जाच्या विळख्यात

CD

चाकण, ता. १८ : निर्यात बंद असल्याने राज्यातील सर्वच बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक वाढत आहे. त्यामुळे बाजारभाव प्रतवारीनुसार आठ रुपये ते १६ रुपये प्रतिकिलोस मिळत आहे. परिणामी बाजारभावात मोठी घसरण होत आहे. मिळणाऱ्या तुटपुंज्या भावातून उत्पादन खर्चही वसूल होत नाही. आर्थिक गणित कोलमडल्यामुळे उत्पादक कर्जाच्या विळख्यात सापडला आहे.

सध्याच्या केंद्र सरकारच्या धोरणात्मक निर्णयांमुळे निर्यात काही देशात बंद तसेच मर्यादित केली आहे. सरकारने कांद्याच्या निर्यातीवर विविध निर्बंध घातले आहेत. त्यामुळे देशी कांद्याला परदेशी बाजारपेठांचे दरवाजे बंद झाले आहेत. त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे. नाशिक, पुणे, अहिल्यानगर, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांतील शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन घेतात. निर्यात ठप्प झाल्यामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. त्यामुळे बाजारभाव कोसळले आहेत.
दरम्यान, भारतातून दुबई, आखाती प्रदेश, बांगलादेश, श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर, नेपाळ आदी तसेच मध्यपूर्व देशात कांद्याची निर्यात होत आहे.

अशी आंतरराष्ट्रीय परिस्थिती
- आंतरराष्ट्रीय बाजारात  चीन, पाकिस्तानच्या कांद्याला मागणी
- भारताने निर्यात कमी केल्यामुळे इतर देशांच्या निर्यातीत वाढ
- विशेषतः पाकिस्तानच्या कांद्यास दुबई, आखाती प्रदेश, बांगलादेशात पसंती


बाजारपेठ पुन्हा मिळवणे आव्हानात्मक
कांद्याचे बाजारभाव राज्यातील विविध बाजारात घसरत आहेत. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. पुढील काळात भारताला बाजारपेठ पुन्हा मिळवणे आव्हानात्मक ठरू शकते, असे निर्यातदार व्यापारी माणिक गोरे, विक्रम शिंदे आदींनी यांनी सांगितले.

कांदा फेकून देण्याची वेळ
कांदा उत्पादनासाठी बियाणे, खते, औषधे, मजुरी, वाहतूक यांचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मात्र बाजारभाव ८ ते १५,१६ रुपये प्रतिकिलोला असल्याने शेतकरी आर्थिक तोट्यात आला आहे. त्यामुळे काही वेळा कांदा भाव न मिळाल्याने कांदा फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यावर येत आहे. वखारीत साठवणूक केल्यानंतर कांदा खराब होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.

निर्यात धोरणात सातत्य नसल्याने कांद्याच्या निर्यातीवर परिणाम होत आहे. सध्या मिळणाऱ्या भावातून उत्पादनही खर्चही निघत नाही. चाळीत साठविलेला कांदा सडू लागला आले. योग्य बाजारभाव मिळाला नाही तर पिकासाठी घेतलेले कर्ज कसे फेडणार? योग्य वेळी निर्यातीस परवानगी दिली तसेच साठवणूक सुविधा वाढवल्या तर शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो.
- हनुमंत गाडे, कांदा उत्पादक शेतकरी, चाकण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NED, T20 WC: टीम इंडियाचा विजयी चौकार! नेदरलँड्सने दिली कडवी झुंज; आता Super 8s मध्ये भारतासमोर ३ तगडे संघ

मोठी बातमी! उजनीतून सोडलेले पाणी कर्नाटकने आडविले, दक्षिण सोलापूरमधील शेती, गावे तहानली; तरीपण जलसंपदामंत्री विखे पाटील कॉल उचलेनात, वाचा...

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपींनी दिला कबुलीजबाब!

Dumper Accident : भरधाव डंपरची आठ वाहनांना धडक; कात्रज ते वडगावदरम्यान महामार्गावर थरार

Mangalwedha News : 1650 अल्पभूधारक शेतकऱ्यांना मनरेगा योजनेचा लाभ देण्याची सुनंदा आवताडे यांची भरत गोगावले यांच्याकडे मागणी

SCROLL FOR NEXT