पुणे

जिल्ह्यात वीट उत्पादकांची धावपळ

CD

चाकण, ता.२४ : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण, पावसाची शक्यता तसेच काही भागात अवकाळी पावसाच्या सरी पडल्या आहेत. त्यामुळे वीट उत्पादकांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. विटा भाजण्यासाठी, भट्टी लावण्यासाठी वीट उत्पादकांची तसेच मजुरांची धावपळ मात्र सुरू आहे.

वीट तयार करण्यासाठी प्रथम मातीची आळी तयार केली जातात. माती पाण्यात मळून साच्यात घालून विटाचा आकार दिला जातो. त्यानंतर त्या विटा मोकळ्या जागेत उन्हात वाळविल्या जातात. ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश कमी प्रमाणात मिळत असल्याने विटा वेळेत वाळत नाहीत. परिणामी उत्पादनाचा वेग मंदावला आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरींमुळे अर्धवट वाळलेल्या विटांचे नुकसान झाले आहे. यामुळे उत्पादकांचे आर्थिक नुकसान होत आहे.
दरम्यान, अनेक बांधकाम व्यावसायिकांनी आगाऊ नोंदणी करूनही विटांचा पुरवठा वेळेत होत नाही. त्यामुळे वीट उत्पादकांवर ताण वाढला आहे. मजुरांनाही याचा फटका बसत आहे.
दरम्यान, विटाचे भाव शेकडा चौदाशे रुपये आहे. एक हजार विटा १४ हजार रुपयांना विकल्या जातात. सिमेंटी विटा साधारणपणे आठ ते साडेआठ रुपयाला एक विकली जाते. परंतु सध्याच्या काळात मातीच्या विटांना मागणी अधिक आहे.

प्लॅस्टिक कागद टाकून विटांचे संरक्षण
ढगाळ हवामानामुळे विटांच्या भट्ट्यांमध्ये कोळशाचा व इतर जळाऊ लाकडाचा वापर वाढला आहे. माती, कोळसा, इंधन, वाहतूक खर्च वाढलेले असताना अतिरिक्त खर्चामुळे उत्पादकांच्या नफ्यावर परिणाम होत आहे. काही उत्पादकांनी विटांवर प्लॅस्टिक कागद टाकून विटांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे.

सध्या ढगाळ हवामानामुळे वीट उत्पादनावर मोठा परिणाम झालेला आहे. ऊन नसल्यामुळे विटा लवकर वाळत नाहीत. भट्टी लावल्यानंतर व ती पेटवल्यानंतर साधारणपणे पंधरा दिवसात विटा व्यवस्थित भाजतात. साधारणपणे २५ ते ५० हजार, एक लाख विटांच्या भट्ट्या लावल्या जातात.
- राम शिर्के कुंभार, वीट उत्पादक


10229

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawrence Bishnoi gang threat : खळबळजनक! महाराष्ट्रातील काँग्रेस आमदाराला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी

गौतम गंभीरनं भारतीय क्रिकेटचं वाटोळं केलं, त्याने संघात राजकारण आणले...! खळबळजनक दाव्याने सारे चक्रावले

Panvel: पनवेलकरांसाठी मोठा निर्णय! सिडको वसाहत आणि २९ गावांना जोडणारी महापालिकेची बससेवा सुरू होणार; बसमार्ग आणि थांबे कसे ठरणार?

Latest Marathi News Live Update : जळगाव जिल्ह्यात हरभरा काढणीला वेग, उत्पन्नातही मोठी वाढ; बळीराजा सुखावला

Raksha Khadse : "आमदारांच्या मुलींच्या हस्ते उद्घाटनं उरकताय का?" रक्षा खडसेंनी 'महावितरण'ला झापले

SCROLL FOR NEXT