पुणे

बेकायदा गॅस रिफिलिंगचा सुळसुळाट

CD

चाकण, ता. २८ : चाकण शहर आणि औद्योगिक वसाहत परिसरात घरगुती गॅस सिलिंडरमधून बेकायदा रिफिलिंग करण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी राणूबाई मळा येथे छापा टाकून एकावर गुन्हा दाखल केला आहे.
चाकणसह कुरुळी, भांबोली फाटा, महाळुंगे, खालुंब्रे, निघोजे, खराबवाडी, मोई, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, कडाचीवाडी, रासे, भोसे, वाकी, शेलपिंपळगाव, चिंबळी फाटा, आळंदी फाटा, सावरदरी परिसरात सुरक्षा नियमांना हरताळ फाळून छोट्या टपऱ्या आणि गोदामांमध्ये गॅस रिफिलिंगचा व्यवसाय सुरू आहे. घरगुती वापराच्या मोठ्या सिलिंडरमधून पाच किलोच्या टाक्यांमध्ये गॅस भरताना अनेकदा स्फोट आणि आगीच्या घटना घडल्या आहेत. औद्योगिक क्षेत्रातील कामगार वर्ग स्वस्त आणि सुटसुटीत म्हणून या पाच किलोच्या टाक्यांना पसंती देतो, ज्याचा फायदा बेकायदा विक्रेते घेत आहेत.
दरम्यान, चाकण पोलिसांनी राणूबाई मळा येथे कारवाई करत दत्ता कोल्हे याच्यावर जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत साडेसात हजार रुपयांचे साहित्य, गॅस टाक्या आणि नोझल जप्त करण्यात आले आहेत. तसेच बेकायदा गॅस रिफिलिंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी दिली . प्रशासकीय आशीर्वादानेच हे धंदे खुलेआम सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून या टोळ्यांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

दुर्घटनांची वारंवारता
काही ठिकाणी गॅस रिफिलिंग करताना स्फोट झाले आहेत. आगी लागलेल्या आहेत. असे प्रकार चाकण, महाळुंगे, झित्राई मळा, नाणेकरवाडी, भांबोली फाटा येथे घडलेले आहेत.अधिकृत परवानगीशिवाय सुरक्षा नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून लहान गॅरेज, गोदामे, तसेच छोट्या पत्र्याच्या टपरीवर गॅस सिलिंडरमधील गॅस दुसऱ्या पाच किलोच्या सिलिंडरमध्ये भरला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अशोक खरातच्या अत्यंत जवळच्या माणसाचा अपघाती मृत्यू; शिर्डी जमीन घोटाळ्यात होते साक्षीदार

Fake Alphonso Mango in Nipani : हापूसच्या पेटीत कर्नाटकी आंबा! बाजारात ग्राहकांची मोठी फसवणूक; 700 ते 800 रुपये दराने मिळतोय आंबा

Latest Marathi News Live Update: अशोक खरातच्या ओकस कार्यालयात ईडीकडून गेल्या तीन तासांपासून झडती सुरू

Pune Sugar Protest: शेतकऱ्यांचा एल्गार!घामाच्या पैशासाठी 'आरपार'ची लढाई; ३० एप्रिलपासून पुण्यातील साखर संकुलाला बेमुदत वेढा..

Success Story: ग्रामीण भागातून न्यायालयापर्यंतचा प्रवास; कल्पेश कड न्यायाधीशपदी विराजमान, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

SCROLL FOR NEXT