पुणे

खराबवाडीतील मार्गावर कचऱ्याचा धूर

CD

चाकण, ता. १५ : चाकण- तळेगाव मार्गावरील खराबवाडी (ता. खेड) हद्दीत साठलेला कचरा अनधिकृतपणे पेटवला जात असल्याने परिसरात धुराचे लोट पसरत आहेत. यामुळे वाहनचालकांची दृश्यमानता कमी होऊन अपघाताचा धोका वाढला असून, नागरिकांच्या श्वसनाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
खराबवाडी ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कचऱ्याचे मोठे ढीग साठले आहेत. हा कचरा जाळला जात असल्याने सकाळी आणि सायंकाळी दाट धूर पसरतो. यामुळे वाहनचालकांना रस्ता दिसत नसल्याने छोटे- मोठे अपघात घडत आहेत. या धुराचा सर्वाधिक त्रास लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दमा असलेल्या रुग्णांना होत आहे.
याबाबत स्थानिक नागरिक, कामगार आणि प्रवाशांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्याऐवजी तो जाळण्यावर भर दिला जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनीही या मार्गावरील वाहतूक सुरक्षिततेकडे लक्ष देण्याची गरज आहे. प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन कचरा जाळणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

मार्गावरील कचरा, तसेच गावातील कचरा दररोज वाहनाद्वारे उचलला जातो. परंतु, औद्योगिक वसाहतीमुळे मोठी रहिवासी वस्ती, भाडेकरू वर्ग असल्यामुळे कचऱ्याचे प्रमाण मोठे आहे. कचरा टाकण्यासाठी ग्रामपंचायतीला स्वतःची जागा नाही. त्यामुळे असे प्रश्न उद्भवत आहेत.
- नीलिमा जाधव, ग्रामविकास अधिकारी, खराबवाडी

10473

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Booking Updates: ग्राहकांसाठी मोठा दिलासा! जुनी सुविधा पुन्हा सुरू... आता बुकिंग कसं बदललं ते जाणून घ्या

"त्यावेळी मला खूप त्रास झाला" मुलाच्या नावाच्या ट्रोलिंगवर चिन्मयची पत्नी अखेर व्यक्त;"तुम्हाला अधिकार नाही"

Thane Hospital: हेलीपॅड, एअर अ‍ॅम्ब्युलन्स, ९०० बेड अन्...; ठाण्यातील नवे हॉस्पिटल गेमचेंजर ठरणार, कोणत्या सुविधा मिळणार?

तू इतकी चांगली आहेस मग... तमन्ना भाटियाला हॉटेलच्या मालकाची पत्नी असं काहीतरी बोलली की... अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

Andaman Sea tragedy : अंदमान समुद्रात भीषण दुर्घटना; २५० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती, मानव तस्करीचा उलगडा

SCROLL FOR NEXT