पुणे

चाकणकरांना जलतरण तलावाची प्रतीक्षा

CD

हरिदास कड : सकाळ वृत्तसेवा
चाकण, ता. २३ : येथील नगरपरिषदेच्या हद्दीत जलतरण तलाव नसल्यामुळे नागरिक, विद्यार्थी, तरुणांमध्ये नाराजी वाढत आहे. तलाव नसल्याने काही मुले पाझर तलावात, भामा, भीमा नदीत पोहायला जातात. त्यामुळे पाण्यात बुडून मृत्यू होण्याच्या घटना वाढत आहेत. सुरक्षित पोहण्याचा आनंद घेण्यासाठी चाकणकर शासकीय जलतरण तलावाच्या प्रतीक्षेत आहेत.

उन्हाळ्यात मुलांना पोहण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने पालकांची गैरसोय होत आहे.
मागील वर्षी कडाचीवाडी येथील पाझर तलावात पाण्यात बुडून पाच लहान मुलांचा मृत्यू झाला होता. तसेच भामा नदीत बुडून अनेक तरुण, कामगार यांचे मृत्यू दरवर्षी होत आहेत ही चिंतेची बाब आहे, पण याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
चाकण नगरपरिषदेकडून जलतरण तलावाबाबत कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत असे मत नागरिक, कामगार करीत आहेत. चाकण परिसरात जलतरण तलाव उभारण्याची मागणी नागरिकांची अनेक वर्षांपासून आहे.
पुढील काळात नगरपरिषद या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

- अपुऱ्या क्रीडा सुविधांमुळे नागरिक, कामगारांत नाराजीचा सूर
- खासगी जलतरण तलाव, कडाचीवाडीतील पाझर तलावांवर भिस्त
- भाम, संतोषनगर, वाकीखुर्द येथील भामा नदीत पोहण्याला पसंती
- नदीत पोहण्यामुळे वेळ, खर्च वाया जातो तसेच धोकाही
- अनेक मुले पोहण्याच्या कौशल्यापासून वंचित


नागरिकांची पोहण्याची हौस अडकली लालफितीत
चाकण नगरपरिषदेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) गेली दहा वर्षे लालफितीत अडकला आहे. तो अजूनही मंजूर झालेला नाही. त्यामुळे पायाभूत सुविधा नगरपरिषदेला करता येत नाही. त्यासाठी निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे जलतरण तलाव उभारण्यात आला नाही.

नगरपरिषदेचा डीपीआर मंजूर झाल्यानंतर योग्य त्या पायाभूत सुविधा लवकरच निर्माण केल्या जातील. त्यामध्ये जलतरण तलावही निर्माण केला जाईल.
- डॉ. अंकुश जाधव, मुख्याधिकारी, चाकण नगरपरिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shocking News : जग सोडताना त्याने जिवाभावाचा दोस्तही सोबत नेला ! प्रॉपर्टी डीलरने पाळीव कुत्र्यासह जीवन संपवले, बंद खोलीत आढळले मृतदेह

Nashik Highway News: पुणे–नाशिक महामार्गावरील पेठ, गायमुख, एकलहरे येथे अंडरपास-ओव्हरब्रिजला गडकरींची तातडीची मंजुरी

Pune Police Recruitment News: शेतकरी कुटुंबातील प्रणाली पाटीलची संघर्षातून पुणे शहर पोलीस म्हणून निवड; लाखणगाव परिसरातून कौतुकाचा वर्षाव

Pargaon Police News: काठापूर बुद्रुकमध्ये मेंढपाळ महिलेची सव्वातीन लाखांची कापडी पिशवी ४८ तासांत शोधून पोलिसांनी परत केली

MI vs CSK Live: सर्वात मोठी बातमी; रोहित शर्मा, MS Dhoni ला वानखेडेवर खेळताना पाहण्यासाठी जाताय, मग हे नक्की वाचा...

SCROLL FOR NEXT