पुणे

वाळद येथील महावितरणचा खांब अखेर हटविला

CD

चास, ता. १ ः शिरूर-भिमाशंकर राज्य मार्गावर वाळद (ता. खेड) गावच्या हद्दीतील रस्ता रुंदीकरण करताना महावितरणचा खांब अडथळा ठरत होता. याबाबत सकाळमध्ये वृत्त प्रसिद्ध झाले. याची दखल घेऊन महावितरणने तो खांब काढून वाहतूक सुरक्षित केली.

शिरूर-भिमाशंकर राज्य मार्ग लवकरच महामार्गात रूपांतरित होणार असून या मार्गावरील अरुंद असणाऱ्या पुलांचे रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. वाळद, आव्हाट, डेहणे व टोकावडे येथील अरुंद असणाऱ्या पुलांची कामे जवळपास पूर्णत्वास गेले आहे. या पुलाला लागून असणाऱ्या रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येत आहे. वाळद येथील पुलाचे काम पूर्ण झाले आहे. पुलाला जोडणारे रस्त्याचे रुंदीकरण करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रयत्न सुरू आहेत. याचवेळी रस्त्याच्या रुंदीकरणात विजेच्या खांब अडथळा ठरत होता. हा खांब सार्वजनिक बांधकाम विभागाने काढायचा की महावितरणने यामध्ये तो अडकला होता. या बाबत ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध महावितरणने याची दखल घेत हा खांब दुसरीकडे हलवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीवनमान-जीवनभान : व्यायामाने जपूया मानसिक आरोग्य

Pimpri Raja Accident: पिंप्री राजा गणेश मिरवणुकीत बेकाबू ट्रेलर घुसला; दोघांचा मृत्यू, सात जखमी, गावावर शोककळा

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

SCROLL FOR NEXT