पुणे

वाडा येथील उपक्रमात अधिकाऱ्यांचीच गर्दी

CD

चास, ता. १८ ः वाडा (ता. खेड) येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय लोकशाहीदिनी आयोजित कार्यक्रमाला नागरिकांनी पाठ फिरवली. या कार्यक्रमाची माहिती कोणालाच नव्हती. त्यामुळे या कार्यक्रमात नागरिकांच्या ऐवजी अधिकाऱ्यांचीच गर्दी जास्त होती.

प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी खेड तालुक्यातील एका गावात तालुकास्तरीय लोकशाही दिन साजरा केला जातो. सोमवारी (ता. १७) वाडा येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात या लोकशाही दिन प्रांतअधिकारी अनिल दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात प्रांताधिकारी अनिल दौंडे, गावच्या सरपंच रूपाली मोरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाली. कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी विशाल शिंदे, नायब तहसीलदार राम बीजे, सहायक निबंधक सचिन सरसमकर, प्रकाश पाचारणे, सतीश चांभारे, बाळासाहेब चौधरी, बबनराव पाटोळे, श्रीपाद बलशेटवार, राम जाधव, दत्ता फापाळे, अमोल घाटकर, अशोक शेळके, स्वाती येवले, संजय पाटील, बाळू थोरात, मच्छिंद्र मस्के, महेश नेहरे, शिवाजी मोरे, नीलेश घनवट, राजेंद्र वाडेकर, सोमनाथ माळी, आकाश बेंडूरे, संदीप भालेराव, शरद पवळे, दादासाहेब जंगले, दत्ता कंद आदी उपस्थित होते.

प्रांताधिकारी दौंडे म्हणाले, ‘‘लोकशाही दिनासाठी सर्व अधिकारी एका जागी येत असल्याने तक्ररींचा व समस्यांचा निपटारा लगेच होतो. नागरिकांच्या समस्यांचे समाधान गरजेचे असून या कार्यक्रमाची प्रसिद्धी न झाल्याने नागरिकांचा प्रतिसाद कमी मिळाला, यापुढे ही खबरदारी घेतली जाईल.
बबनराव पाटोळे यांनी मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Final, RCB vs GT live: अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला! दुसऱ्या ट्रॉफीसाठी बंगळुरू-गुजरात आमने-सामने; कुठे अन् कधी पाहाणार मॅच?

Chandrapur: काँग्रेसची उमेदवारी अग्रवालांच्या गळ्यात?; चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज संस्था मतदार संघ

Viral Video: IT मॅनेजरची लाखोंची नोकरी सोडली; आता ऑटो चालवून महिला कमावते 60 हजार, कारण ऐकून थक्क व्हाल!

अभिषेक बॅनर्जींनंतर TMCच्या खासदाराला मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत; भाजप म्हणते हे नाटक

Latest Marathi News Live Update : चंद्रपूरात रानटी हत्तींचा वावर वाढला; वन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

SCROLL FOR NEXT