पुणे

मोहोराचे संरक्षण करण्यासाठी फवारणीचे नियोजन करा

CD

चास, ता. ८ ः ‘‘पोषक वातावरणामुळे आंब्याची झाडे मोहोराने बहरण्यास सुरुवात झाली असून, अधिक उत्पादनासाठी आंब्याच्या बागांवर कृषी विभागाच्या सल्ल्याने रासायनिक, तसेच जैविक औषधांची फवारणी करून आपल्या आंबा पिकातून जास्तीत जास्त उत्पादन घ्या,’’ असे आवाहन उप कृषी अधिकारी प्रवीण शिंदे यांनी केले आहे.
गेली काही वर्षांपासून शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत इतर पिकांकडे वळल्याचे चित्र आहे. त्यामध्ये फळबागांना प्राधान्य दिलेले असून, आंबा पिकाकडे सर्वाधिक ओढा दिसत आहे. सद्यःस्थितीत सर्वत्र थंडीचे वातावरण असून, दुपारच्या सत्रात उन्हाचा तडाखाही जाणवत आहे. या पोषक वातावरणामुळे आंब्यांची झाडे मोहोराने बहरण्यास सुरुवात झाली असून, काही ठिकाणी आंब्याची झाडे पूर्णपणे मोहोराने बहरलेली दिसत आहेत. मात्र, या मोहोराचे वेळीच नियोजन केले नाही, तर मोहोर गळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.
आंब्याच्या झाडांना या दिवसात पाणी देऊ नये, झाडांच्याखाली खोडाकडे जमीन खोदावी,. त्यामुळे जमिनीतील ओलसरपणा संपुष्टात येईल व मोहोर जास्त प्रमाणात येईल. झाडाच्या फांद्यावर व नवीन फुटवे आलेल्या ठिकाणी काळसरपणा किंवा काळे ठिपके दिसू लागतात. तो बुरशीचा प्रकार असतो. यशिवाय मोहोर आल्यावर त्यावर काळा मावा, हिरवा मावा, तुडतुडे, बुरशीजन्य रोगांचा प्रादूर्भाव होत असल्याने मोहोराची गळ होते. यासाठी कृषी विभागाशी संपर्क करून त्याच्या मदतीने रासायनिक किंवा जैविक पद्धतीने कीड व्यवस्थापन करावे. जैविक औषधांमध्ये लिंबोळी अर्क, नीम अर्क याचा वापर करावा. आंबा बागांमध्ये निळ्या रंगाचे व पिवळ्या रंगाचे चिकट सापळे लावावे, यामुळे कीड नियंत्रण होऊन आंबा पिकापासून जास्तीत जास्त उत्पन्न घेता येईल, असे शिंदे यांनी सांगितले.

04214

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: "बिचारे देव मतदान करू शकत नाही, म्हणून..."; उच्च न्यायालयाने अधिकाऱ्यांना फटकारले, काय आहे प्रकरण?

Ichalkaranji Firing News : इचलकरंजीत पोलिसादेखत गुंडावर गोळीबार, भरवस्तीत प्रकाराने एकच धावाधाव; जखमी सांगलीचा; हल्लेखोर पसार

Latest Marathi News Live Update : एसबीआय एनर्जी लिमिटेड कंपनीच्या स्फोटातील आरोपी कंपनी मालक अद्यापही फरार

मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडले जाणार; ‘हे’ आहे कारण, महावितरणकडून ग्राहकांना इशारा, वाचा...

अग्रलेख : युद्धाच्या पडछायेत...

SCROLL FOR NEXT