पुणे

खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात बहरल्या करवंदांच्या जाळ्या

CD

चास, ता. १२ : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये विस्तृत प्रमाणात असणाऱ्या करवंदांच्या जाळ्या बहरू लागल्या आहेत. लवकरच या परिसरातील प्रामुख्याने आदिवासी नागरिकांना डोंगरच्या काळ्या मैनेच्या रूपात व्यवसायाच्या वाटा सुरू होणार आहेत.
खेडच्या पश्चिम पट्ट्यात आदिवासी नागरिकांचे वस्तीस्थान आहे. या परिसरात असणाऱ्या डोंगरराशी येथील आदिवासी नागरिकांसाठी खरीप व रब्बी पिकांचा हंगाम संपताच उन्हाळ्यामध्ये काळी मैना उत्पन्नाचा मुख्य स्रोत असतो. या परिसरात मोठ्या प्रमाणावर करवंदांच्या जाळ्या असून या जाळ्या सध्या पांढऱ्याशुभ्र फुलांनी बहरू लागल्या आहेत. ही पांढरीशुभ्र फुले मंद सुगंधांनी पर्यटकांना आकर्षित करीत असली तरी या फुलांपासून तयार होणारी फळे मात्र कित्येक आदिवासी नागरिकांचे संसार फुलवणारी आहेत. याचा सगळ्यात जास्त फायदा येथील स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या रूपाने होणार आहे. उन्हाळ्यात सर्वत्र शेतीची कामे ठप्प झाल्यावर, कोणत्याही प्रकारचे उत्पन्नाचे साधन नसताना या सह्याद्रीच्या कुशीतून फुलणारा हा रानमेवा आदिवासींच्या चरितार्थाचा मुख्य आधार ठरतो.

04306

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Andaman Sea tragedy : अंदमान समुद्रात भीषण दुर्घटना; २५० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती, मानव तस्करीचा उलगडा

Abhishek Sharma Axar Patel Dope Test : अभिषेक शर्मा, अक्षर पटेल 'नाडा' च्या रडारवर; आता कुठे जाता हे सांगावं लागेल... नाहीतर...

खट्याळ, बिनधास्त आणि गप्पिष्ट बाईची मजेशीर दुनिया; कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत यांच्या ‘भागूबाई’चा ट्रेलर प्रदर्शित

Latest Marathi News Live Update: मुंबईत गांजा विकणाऱ्या दोन आरोपींना अटक

सतीश राजवाडे आणि ये रिश्ता फेम अभिनेत्रीचा रंगभूमीवर कमबॅक; नाटकाचं नाव आणि शुभारंभाची तारीख जाहीर

SCROLL FOR NEXT