पुणे

टोकावडे परिसरात वन्यप्राण्यांची थांबणार भटकंती

CD

चास, ता. ता. १७ : टोकावडे (ता. खेड) वनपरिमंडल अधिकारी दत्ता फापाळे यांच्या वनपरिक्षेत्रात विविध भागात वनविभागाच्या वतीने कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. वन्यप्राण्यांसाठी या वनतळ्यात टॅंकरद्वारे पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे वन्यप्राण्यांची भटकंती थांबणार आहे.
उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती थांबावी, यासाठी खेड वनविभागाच्या वतीने
वनपरिक्षेत्र अधिकारी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनहद्दीत कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत, अशी माहिती राजगुरुनगरचे वनपरिक्षेत्र अधिकारी लोकेश पाटील यांनी दिली.

यावेळी वनपाल फापाळे म्हणाले की, वनाचे क्षेत्र मोठे आहे यात बिबटे, मोर, लांडोर, तरस, लांडगे, कोल्हे, ससे, वानरे, सांबर यांसह अन्य वन्यप्राणी व पक्षी असून जंगलातील नैसर्गिक जलसाठे जवळपास संपुष्टात आल्याने वन्यप्राणी व पक्ष्यांच्या पाण्याची गरज लक्षात घेत वनसमितीच्या मदतीने पाणवठे तयार केले आहेत. पाणवठ्यात टँकरच्या साह्याने पाणी सोडण्यात येत आहे.

पाणवठ्याचा परिसर स्वच्छ
धामणगाव खुर्द येथे असलेल्या कृत्रिम पाणवठ्यामध्ये एक महिना पुरेल एवढा पाणीसाठा होत असून महिन्याने या पाणवठ्यात टँकरच्या साह्याने पाणी सोडण्यात येते. पाणवठ्याचा परिसर स्वच्छ केला आहे. या पाणवठ्यात टँकरच्या साह्याने पाणी सोडून वन्य प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था केली आहे.

यावेळी वनपरिमंडल अधिकारी दत्ता फापाळे यांच्यासह वनरक्षक सचिन आंबेकर, कौसल्या पवार तसेच वनमजूर सोमनाथ मुऱ्हे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

04394

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलगा दत्तक घेणाऱ्या महिलांना मातृत्व रजेपासून वंचित ठेवणं असंवैधानिक, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय...

Stock Market Today: शेअर बाजार तेजीत! हे शेअर्स चमकले; मात्र मोठ्या IPO ला ब्रेक का?

मोठी बातमी! ठाणे-मुलुंडदरम्यान नवे रेल्वे स्थानक उभारण्यास मंजुरी; स्टेशनला आनंद दिघेंचे नाव देण्याची खासदारांची मागणी

Latest Marathi News Live Update : मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

पत्नी देवीशाचा एक प्रश्न अन् सूर्यकुमार यादवच्या कारकीर्दिला मिळाली कलाटणी; T20 World Cup विजेत्या कर्णधाराने अखेर सिक्रेट सांगितले

SCROLL FOR NEXT