पुणे

शेळ्या मेंढ्यांपेक्षा मुलांना वाचविण्याची वेळ

CD

खोडद, ता.३०: बिबट्यांची समस्या जुन्नर वनविभागाच्या वनपरिक्षेत्रातील गावांत सध्या जीवघेणी ठरत आहे. यामुळे बिबट्यापासून शेळ्या मेंढ्यांपेक्षा आता मुला बाळांना वाचविण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. बिबट्यांची समस्या रोखण्याबाबत केंद्राकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याने बिबट्यांची संख्या वाढत आहे. सध्या मुलांवरील हल्ले वाढत असल्यामुळे योग्य उपाययोजनांची मागणी नागरिकांकडून होत आहे.

जुन्नर विभागात बिबट्यांचे वाढते हल्ले यामुळे वनविभाग हतबल झाला आहे. बिबट्याच्या या जीवघेण्या समस्येकडे केंद्र सरकार गांभीर्याने का लक्ष देत नाही, असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. जुन्नर वनविभागाने यापूर्वी बिबट्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव जानेवारी २०२४ मध्ये राज्य सरकारकडे पाठवला होता. यानंतर या प्रस्तावात काही दुरुस्ती करून हा प्रस्ताव राज्य सरकारकडून पुन्हा नव्याने जुलै २०२४ मध्ये केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे.


ठोस निर्णयाअभावी वनविभाग हतबल
जुलै २०२४ मध्ये पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जुन्नर वनविभाग (जुन्नर,आंबेगाव, खेड आणि शिरूर) ‘बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र’ म्हणून घोषित केला आहे. त्या अंतर्गत वनविभागाने बनविलेल्या आराखड्यानुसार विविध शासकीय विभागांना जिल्हाधिकारी यांनी विशिष्ट जबाबदारी दिली आहे. बिबट्यांच्या समस्या रोखण्याबाबत वनविभागाने ज्या काही मागण्या केल्या होत्या, त्याबाबत मात्र केंद्राने कोणताच ठोस निर्णय न घेतल्याने वनविभाग देखील हतबल झाला आहे.


जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरूरमधील स्थिती
४३ .... मृत्यू
४.... लहान मुलांचा मृत्यू
१५०.... जखमी (२००१ ते ३० सप्टेंबर २०२४)

नागरिक आणि बिबट्याला एकमेकांची सवय
२००१ पासून बिबट्यांचे जुन्नर वनविभागात वास्तव्य आहे.सुरुवातीच्या काळात २००१ ते २००७ पर्यंत बिबट्यांकडून मानवी हल्ल्यांच्या घटना घडल्याने या काळात मानव- बिबट संघर्ष अधिक तीव्र झाला होता.नंतरच्या काळात हा संघर्ष सौम्य होत गेला आणि नागरिकांनी बिबट्यासोबत सहजीवन जगण्याचा प्रयत्न केला.या दरम्यान नागरिकांना आणि बिबट्यांना एकमेकांची जणू सवयच झाली होती, अशा प्रकारे बिबट्या या परिसरात रुळला होता.

सर्व विषयांतील सक्सेस स्टोरी तसेच वाचनप्रिय

यामुळे बिबट्यांच्या संख्येत वाढ
* बिबट्यांच्या उसाच्या शेतीत वाढता अधिवास
* लपायला सुरक्षित जागा, सहज उपलब्ध भक्ष्य
* पाणी या सगळ्याच गोष्टी अगदी सहज उपलब्ध झाल्याने बिबट्यांच्या संख्येत वाढ
* ऊस शेतीचा सुरक्षित अधिवासामुळे बिबट्यांचे सर्वच बछडे जगत आहे.


केंद्र सरकार कधी निर्णय घेणार?
जुन्नर वनविभागात २०२० पासून बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना पुन्हा वाढल्या आहेत. भटकी कुत्री संपवल्यानंतर बिबट्यांनी पाळीव प्राणी तसेच कुत्री यांना लक्ष केले. शेतकऱ्यांनी शेळ्या मेंढ्यांसाठी, जनावरांसाठी बंदिस्त गोठे केले. पाळीव कुत्र्यांनाही लोखंडी पिंजरे केले. दुसरी बाजू म्हणजे बिबट्याने हल्ला केल्यानंतर त्याच्या तावडीतून शेतकरी पाळीव कुत्रे, शेळ्या मेंढ्या सोडवू लागले. या सगळ्या बाबींचा परिणाम असा झाला की बिबट्याचे भक्ष्य कमी झाले आणि तो थेट लहान मुलांवर व माणसांवर देखील हल्ले करू लागला आहे. केंद्र सरकार याबाबत कधी निर्णय घेणार?

बिबट्याची समस्या अतिशय जटिल असल्यामुळे कोणत्याही एका
उपायाने हा प्रश्न हाताळणे कठीण आहे. त्यामुळेच व्यापक जनजागृती, समस्याग्रस्त बिबटे पकडणे, माणिकडोह बिबट निवारा केंद्र विस्तारीकरण करणे, बिबट आपत्ती घोषित करून आराखडा राबविणे, एआयचा वापर व्यापक करणे या उपाययोजना करण्याबरोबरच आम्ही सौर कुंपणाची एक नवीन योजना तयार केली आहे.ती तातडीने अमलात आणणार आहोत.
- अमोल सातपुते, उपवनसंरक्षक, जुन्नर वनविभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: नवल पगार गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

Shirur News : महागणपतीच्या चार बहिणींच्या गावांना देवस्थान ट्रस्टमध्ये प्रतिनिधीत्व देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT