खोडद, ता.२९ : मांजरवाडी (ता.जुन्नर) सर्व व्यवहार बंद ठेवून दुखवटा व्यक्त करत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सर्व व्यावसायिकांनी आपापली दुकाने बंद ठेवून दुखवटा व्यक्त केला.
खोडद, मांजरवाडी, हिवरे तर्फे नारायणगाव, बोरी, साळवाडी, जाधववाडी, शिरोली, सुलतानपूर, निमगाव सावा, पारगाव तर्फे आळे, मंगरूळ या गावांमध्ये व्यापाऱ्यांनी आपली दुकाने व सर्व व्यवहार बंद ठेवून दुखवटा व्यक्त केला. अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. पवार यांच्याविषयी अनेक किस्से, राजकीय प्रसंग आणि त्यांच्या शिस्तप्रिय व अभ्यासू वृत्ती याविषयी जड अंतःकरणातून अनेक चर्चा रंगल्या.
अनेकांनी व्हॉट्सॲप वर स्टेटसला अजित पवार यांचा फोटो ठेवत श्रद्धांजली अर्पण केली.तर अनेकांनी अजित पवार यांच्या काही आठवणी व प्रसंग व्हॉट्सॲपवर शेअर केले. पूर्वीच्या काळात अजित पवार यांच्यासोबत ज्यांच्या भेटीचा प्रसंग आला अशा अनेकांनी पवार यांच्यासोबत काढलेले फोटो व्हॉट्सॲप स्टेट्सवर ठेवत समाज माध्यमांवर प्रसारित करून श्रद्धांजली वाहिली.
01920
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.