पुणे

दौंडला १८ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात

CD

दौंड, ता. २० : दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात आहेत, अशी माहिती सहायक निबंधक (सहकार) हर्षित तावरे यांनी दिली.
बाजार समितीच्या १८ जागांसाठी २११ उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. दौंड शहरातील सहकार भवन येथे गुरुवारी (ता. २०) बहुसंख्य इच्छुकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने १८ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात आहेत. सेवा सहकारी संस्था मतदारसंघाच्या सर्वसाधारण, महिला, इतर मागास प्रवर्ग, भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी राखीव एकूण ११ जागांसाठी २५ उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघाच्या सर्वसाधारण, अनुसूचित जाती जमाती आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी राखीव, अशा एकूण ४ जागांसाठी ८ उमेदवार रिंगणात आहेत. तर, आडते-व्यापारी मतदारसंघाच्या २ जागांसाठी ४ उमेदवार आणि हमाल-मापाडी मतदारसंघातील १ जागेसाठी २ उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, नोव्हेंबर २०१६ मध्ये १९ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत एक जागा बिनविरोध झाल्याने राहिलेल्या १८ जागांसाठी ४८ उमेदवार रिंगणात होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

Water Crisis: देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली

लग्न झालेलं असो किंवा नसो, स्वेच्छेने ठेवलेल्या लैंगिक संबंधांना चुकीचं म्हणता येणार नाही- हायकोर्ट

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Latest Marathi News Live Update : दिल्लीच्या रस्त्यावर थरार, पोलीस गुंडांमध्ये चकमक

SCROLL FOR NEXT