पुणे

दौंड-कुरकुंभ महामार्गावरून गोवंशाची बेकायदा वाहतूक

CD

दौंड, ता. १८ : दौंड-कुरकुंभ महामार्गावरून १६ गोवंशाची बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी दोन वाहन चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. काष्टी (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथील आठवडे बाजारातून गोवंशाची शनिवारी (ता. १७) दौंडमार्गे कर्नाटक येथे वाहतूक करणार असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. त्यानुसार गोरक्षण क्षेत्रात सामाजिक काम करणाऱ्या तरुणांनी मोरे वस्ती येथे दोन वाहने अडवून पाहणी केली. त्यामध्ये ४ गावरान बैल, ४ जर्शी गाया, ६ गावरान गाया व दोन वासरे, अशी एकूण १६ गोवंश जनावरे कोंबण्यात आली होती. यानंतर संबंधित वाहने दौंड पोलिस ठाण्यात आणण्यात आल्यानंतर पोलिसांनी पशू वैद्यकीय अधिकारी यांना तपासणीसाठी पाचारण केले. याप्रकरणी अहिरेश्वर जगताप यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी रेवणसिध्द मल्लापा उटगी (रा. हवीनाळ, इंडी, कर्नाटक) व प्रकाश नागप्पा वालीकर (रा. कडचण, इंडी, कर्नाटक) या दोन चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनी सहा तास या गोवंशांना चारा आणि पाण्यापासून वंचित ठेवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger: ..म्हणून ऑपरेशन टायगर अपयशी? भाजपच्या शब्दावर खासदारांची मदार, दोघांच्या सह्याच नाहीत

BMC jobs: मुंबई महापालिकेकडून मोठी भरती जाहीर! २० ते ३० हजार पगार अन्... राजावाडी रुग्णालयात विविध पदांसाठी संधी, अर्ज कसा करायचा?

Latest Marathi News Live Update: पुण्यातील कचऱ्यासंदर्भात राज्यमंत्र्यांचे आदेश

T20I World Cup, IND vs NED: स्मृती मानधनाचा अर्धशतकासह मोठा विक्रम, शफाली वर्माचीही वादळी फिफ्टी; भारताच्या २०० धावा पार

Nasrapur Crime Case : नसरापूर प्रकरणात सरकार पक्षाने १६ दिवसांत सादर केले पुरावे; ५५ साक्षीदारांची नोंदवली साक्ष

SCROLL FOR NEXT