

Mumbai BMC jobs
ESakal
मुंबई महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयात विविध पदांसाठी कंत्राटी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. रुग्णालयात फार्मासिस्ट, ब्लड बँक टेक्निशियन, ज्युनियर लायब्रेरियन आणि स्टाफ नर्स या एकूण चार जागा कंत्राटी तत्त्वावर भरल्या जातील. निवड झालेल्या उमेदवारांना २०-३० हजार रुपये मासिक मानधन दिले जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवार १८ जूनपर्यंत अर्ज करू शकतात.