दौंड, ता. १८ : दौंड- पाटस अष्टविनायक मार्गावर गोंधळ घालणाऱ्या एका तरुणाने कारवाई करण्यास गेलेल्या पोलिस पथकाशी अरेरावी करीत शिवीगाळ केली. तरुणाने पोलिसांना अॅट्रॉसिटीअंतर्गत खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे.
दौंड- पाटस मार्गावरील ‘हॅाटेल चेअरमन ढाबा’ येथे सोमवारी (ता. १७) आनंद लक्ष्मण सदाफुले (वय २५, रा. जनता विद्यालयाजवळ, लिंगाळी रोड, दौंड) हा तरुण गोंधळ घालत होता. हॅाटेलमालकाने महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद प्रणालीअंतर्गत असणाऱ्या ‘११२’ या क्रमांकावर याविषयी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर दौंड पोलिसांचे एक पथक हॅाटेलमध्ये दाखल झाले. त्यावेळी आनंद सदाफुले याने पथकातील एका पोलिसाची कॅालर पकडून शिवीगाळ सुरू केली. पोलिसांनी त्याला समजावून शासकीय वाहनातून दौंड पोलिस ठाण्याच्या आवारात आणले. त्यानंतर त्याने पुन्हा गोंधळ घातला. पोलिसांविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करून बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची त्याने धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
या प्रकरणी पोलिस पथकातील एक अंमलदारांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आनंद सदाफुले याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, धाकदपटशा करणे, शांतताभंग करणे, असभ्य वर्तन करणे, आदी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हवालदार आदेश राऊत पुढील तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.