दौंड, ता. १४ : दौंड तालुक्यात बाजरीची आवक वाढली आहे. बाजारभावात प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल १०० रुपयांची वाढ झाली आहे. बाजरीची एकूण २१८ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतवारीनुसार किमान २००० तर कमाल ३४०० प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारात भुसार मालाची आवक वाढली असून, बाजारभाव स्थिर आहे. केडगाव उपबाजारात भुसार मालाची आवक व बाजारभाव स्थिर आहे. तर पाटस व यवत येथील उपबाजारांमध्ये भुसार मालाची आवक घटली असून, बाजारभाव स्थिर आहेत. दौंड मुख्य बाजारात भाजीपाल्याची आवक स्थिर असून बाजारभावात तेजी आहे. केडगाव उपबाजारात चवळीची सोळा क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल किमान ११००० तर कमाल १४००० रुपये असा बाजारभाव मिळाला.
दौंड मुख्य बाजारात कोथिंबिरीची १२६८५ जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० तर कमाल ८०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. मेथीची ४२१५ जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान ७०० तर कमाल १५०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला.
शेतमालाची आवक व बाजारभाव :
* शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रु.) कमाल (रु.)
गहू ८०१ २२०० ३१००
ज्वारी १०५ २५०० ४०५०
बाजरी २१८ २००० ३४००
हरभरा ०८८ ५००० ५५६०
मका ०८६ १४०० २२७५
मूग ०६५ ७२०० ७७३०
तूर ०४५ ६१०० ६५००
बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रतिदहा किलोसाठीचे कमाल दर) : बटाटा-२१०, आले-४००, गाजर-२५०, कैरी-१५०, टोमॅटो-२००, हिरवी मिरची-५००, भेंडी-४००, वांगी - ४००, शिमला मिरची-३००, घेवडा-५००, गवार-६००, लिंबू-९००, कलिंगड - १२०, खरबूज - १००.
काकडी, भेंडी व बटाट्याच्या भावात घट
दौंड मुख्य बाजारात काकडीची ९७ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान ५० तर कमाल २५० रुपये भाव मिळाला. भेंडीची ३० क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान २०० तर कमाल ४०० रुपये असा बाजारभाव मिळाला. बटाट्याची २५२ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान २०० तर कमाल २१० रुपये असा दर मिळाला.
कांद्याच्या दरात वाढ
दौंड तालुक्यात १५ एप्रिलनंतर प्रथमच कांद्याच्या बाजारभावात प्रतिक्विंटल दोनशे रुपयांची वाढ झाली आहे. केडगाव उपबाजारात कांद्याची एकूण ११२६० क्विंटल आवक होऊन प्रतवारीनुसार किमान ३०० तर कमाल १६०० प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.