पुणे

वडगाव बांडेमध्ये आज ‘लोकशाही दिन’

CD

दौंड , ता. २० : वडगाव बांडे (ता. दौंड) येथे सोमवारी (ता. २१) लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती दौंड तालुक्याचे तहसीलदार अरुण शेलार यांनी दिली.
लोकशाही दिनानिमित्त वडगाव बांडे ग्रामपंचायत कार्यालयात तालुक्यातील सर्व शासकीय विभागाचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. सकाळी साडेदहा वाजता ग्रामस्थांना शासनाच्या विविध विभागांसंबंधी असलेल्या अडीअडचणी थेट अधिकाऱ्यांसमोर मांडता येणार आहेत. ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस, कृषी, सामाजिक न्याय, महिला व बालकल्याण, महसूल, पंचायत राज, आरोग्य विभाग आदी शासकीय विभागांचे अधिकारी या वेळी उपस्थित राहणार आहेत. ग्रामस्थांनी या लोकशाही दिनात सहभागी होताना आपले अर्ज तीन प्रतींमध्ये सोबत आणावेत, असे आवाहन शेलार यांनी केले आहे. प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुक्यातील विविध ठिकाणी लोकशाही दिनाअंतर्गत नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्याचे कामकाज केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Rape News : कोल्हापुरात क्रुरतेचा कळस! विळ्याचा धाक दाखवत बापाकडून पोटच्या 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

Latest Marathi News Live Update : पर्यायी मार्गाचा वापर करा, वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे आवाहन

पावसाचं ठरलंय, थांबायचं नाही! कोकणसह मध्य महाराष्ट्र, विदर्भात अजून आठवडाभर जोरदार बरसणार

Panchang 26 October 2025: आजच्या दिवशी शिव सहस्त्रनाम स्तोत्र पठण व ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

सुबत्तेने लकवा भरलाय

SCROLL FOR NEXT