पुणे

दौंडमधील शेतकऱ्यांना ‘फार्मर कप’चे प्रशिक्षण

CD

दौंड, ता. ९ : शेतकऱ्यांना एकत्र आणून गटशेती व सामूहिक उत्पादक गट तयार करण्याचा उपक्रमांतर्गत ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ स्पर्धेकरिता दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. शेतकरी गटांना शाश्वत आणि शास्त्रशुद्ध शेतीकडे वळवून उत्पादन वाढविणे आणि उत्पादन खर्च कमी करणे, हा या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे.
दौंड शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण घेण्यात आले. सेंद्रिय शेतीचा कृतीद्वारे प्रसार करणाऱ्या पारगाव (ता. दौंड) येथील नवनिर्माण न्यासच्या प्रमुख वसुधा सरदार या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी तालुका कृषी अधिकारी अजिंक्य दुधाणे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. यशवंत खताळ, आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रूपनवर यांच्यासह मंडल कृषी अधिकारी, शेतकरी बचत गटांचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते.
यावेळी पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक मयूर साळुंखे आणि वर्षाराणी कदम यांनी ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ आयोजनामागील हेतू, अंमलबजावणी, शेतकऱ्यांना मिळणारे फायदे आणि त्यामधील स्पर्धांविषयी उपस्थितांना माहिती दिली. स्पर्धेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा प्रगतशील शेतीत सहभाग वाढविणे आणि नव्या तंत्रज्ञानाचा प्रसारावर भर आहे. माती परीक्षण, सेंद्रिय शेती, हवामानानुसार पीक व्यवस्थापन, विविध पिकांसाठी सुधारित तंत्रांचा अवलंब, पाण्याचे शास्त्रीय व्यवस्थापन आणि कमी खर्चात अधिक उत्पादन मिळविण्याचे उपाय याविषयी माहिती देण्यात आली. प्रकाश लोणकर यांनी सूत्रसंचालन, तर महेश रूपनवर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Traffic Jam: मुंबई-पुणे ‘द्रुतगती महामार्गा’वर गॅस टँकर उलटला!, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

WPL 2026: जेमिमाहची दिल्ली कॅपिटल्स सलग चौथ्यांदा फायनलमध्ये, गुजरातचा केला पराभव; जेतेपदासाठी RCB शी लढणार

Mumbai Airport incident : मुंबई एअरपोर्टवर भीषण विमान दुर्घटना टळली! ; एअर इंडिया अन् इंडिगो विमानांची पंख एकमेकांना धडकली

मोठी बातमी! ‘टीईटी’त साडेचार लाखातील चार लाख भावी शिक्षक नापास; मराठीचा १२ टक्के तर इंग्रजीचा निकाल ५.४४ टक्के, ३६ जणांचा निकाल ठेवला राखून, वाचा...

Pune Traffic : जेधे चौकात जीव धोक्यात! अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालकांमुळे पादचाऱ्यांची रोजची कसरत

SCROLL FOR NEXT