पुणे

‘दौंड बंद’ला संमिश्र प्रतिसाद

CD

दौंड, ता. २३ : भिगवण येथील कथित अपहरण प्रकरणातील दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी पुकारलेल्या ‘दौंड बंद’ आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. दुपारनंतर बाजारपेठ बंद झाल्यानंतर सकल हिंदू समाजाच्या आंदोलनाला काही पदाधिकाऱ्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला.
सकल हिंदू समाजाच्या वतीने भिगवण येथील कथित अपहरण प्रकरणातील दोषींवर कारवाई करणे व अन्य मागण्यांसाठी सोमवारी (ता. २३) ‘दौंड बंद’ची हाक देण्यात आली होती. परंतु, सकाळी नेहमीप्रमाणे सर्व व्यवहार सुरळीत होते. भाजी मंडई, उपहारगृह, खासगी आस्थापना आणि मुख्य बाजारपेठेमध्ये नागरिक व ग्राहकांची गर्दी होती. दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान सकल हिंदू समाजाच्या वतीने दुकानदारांना ‘बंद’चे आवाहन केले. त्यामुळे शालीमार चौक, सहकार चौक, दौंड- गोपाळवाडी रस्ता, मुख्य बाजारपेठ बंद झाली. त्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाला विरोध करण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत बाजारपेठ बंद झाली होती.
बंद आंदोलनाला पाठिंबा देत दिवसभर दुकाने बंद ठेवणे, स्पष्ट विरोध करणे किंवा काही तासांकरिता दुकाने बंद ठेवणे, याविषयी ठोस भूमिका न घेतल्याने दुकानदार सकाळपासून संभ्रमावस्थेत होते. परिणामी काही दुकाने उघडी तर काही बंद, अशी स्थिती होती. सकाळी दुकाने सुरू असली तरी गोंधळाच्या वातावरणामुळे ग्राहक शहरात फिरकले नाहीत. मुख्य बाजारपेठेत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.


हिंदू जनजागृती समितीची मागणी
सकल हिंदू समाजाच्या वतीने भिगवण येथील कथित अपहरण प्रकरणाचा तीव्र निषेध करण्यात आला. दौंडचे तहसीलदार अरुण शेलार यांच्याकडे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. लव्ह जिहाद व धर्मांतर विरोधी कायदा संमत करणे, राज्यातून बेपत्ता झालेल्या पावणेदोन लाखांपेक्षा अधिक मुली व महिलांच्या शोधासाठी विशेष मोहीम राबविणे, पिडीत मुली व महिलांकरिता स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करून त्यांना मानसिक व कायदेशीर आधार देण्याकरिता समुपदेशन यंत्रणा उभारण्याची मागणी निवेदनात नमूद केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT