दौंड, ता. ५ : दौंड तालुक्यात बाजरीची १७५ क्विंटल आवक झाली. त्यास किमान १७०० तर कमाल ३४०० रुपये क्विंटल असा बाजारभाव मिळाला आहे. प्रतवारीनुसार प्रतिक्विंटल तब्बल दोनशे रुपयांची वाढ झाली आहे.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारात भुसार मालाची आवक घटली असून बाजारभाव स्थिर आहे. केडगाव व पाटस येथील उपबाजारांमध्ये भुसार मालाची आवक वाढली असून बाजारभाव स्थिर आहे. यवत येथे भुसार मालाची आवक व बाजारभाव स्थिर आहे. दौंड मुख्य बाजारात पालेभाज्यांची आवक वाढली असून बाजारभाव स्थिर आहे.
केडगाव उपबाजारात कांद्याची आवक घटली असून बाजारभावात प्रतिक्विंटल ४०० रुपयांची घट झाली आहे. कांद्याची १५५२२ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान २०० तर कमाल ११०० प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला.
दौंड मुख्य बाजारात कोथिंबिरीची १३०८० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० तर कमाल ७०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला. मेथीची ६८४० जुडी आवक होऊन त्यास शेकडा किमान २०० तर कमाल ८०० रुपये जुडी असा बाजारभाव मिळाला.
तालुक्यातील एकूण शेतमालाची आवक व बाजारभाव :
शेतमाल आवक (क्विंटल) किमान कमाल (रू.)
गहू १०२५ २००० २७५०
ज्वारी ०३१२ १७०० ५१००
बाजरी ०१७५ १७०० ३४००
हरभरा ००८० ४००० ५२०१
उडीद ००३१ ५००० ६५००
तूर ००८४ ६००० ७४००
मका ००७० १६०० १८५०
-----
बाजारभाव पुढीलप्रमाणे (प्रतिदहा किलोसाठीचे कमाल दर) : बटाटा-१४०, आले-५००, गाजर-२५०, पेरू-२५०, काकडी-१५०, भोपळा-१५०, कोबी-८०, फ्लॅावर-२००, टोमॅटो-१७५, हिरवी मिरची-८५०, भेंडी-६००, कार्ली-६००, दोडका-४५०, वांगी-४००, बिट- १००, शेवगा-६००, चिक्कू-२५०, लिंबू-९००, कलिंगड- २५०, खरबूज-२५०.
काकडी, कोबी, मिरचीच्या दरात घट
दौंड मुख्य बाजारात काकडीची ९० क्विंटल आवक होऊन त्यास प्रति दहा किलोसाठी किमान ५० तर कमाल १५० रुपये असा बाजारभाव मिळाला. कोबीची १३५ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान ३० तर कमाल ८० रुपये असा बाजारभाव मिळाला. हिरव्या मिरचीस प्रतिदहा किलोसाठी किमान ३०० तर कमाल ८५० रुपये असा बाजारभाव मिळाला.
कलिंगड व खरबुजाची आवक सुरू
दौंड मुख्य बाजारात कलिंगडाची ६५ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान १०० तर कमाल २५० रुपये असा दर मिळाला. खरबुजाची ८० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिदहा किलोसाठी किमान १०० तर कमाल २५०रुपये बाजारभाव मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.