पुणे

दौंडमध्ये जनावरांचा चारा खातोय ‘भाव’

CD

देऊळगाव राजे, ता. १४ : जनावरांच्या चाऱ्याला चांगला बाजारभाव मिळत आहे. यामुळे दौंड तालुक्यात सध्या शेतकरी कडवळ व मका पिकांची पेरणी करीत आहेत. तालुक्यात मका पिकाची सुमारे १६१४ हेक्टरवरमध्ये लागवड झालेली आहे. हा चारा दुभत्या जनावरांना पोषण आहे. सध्या मागणी वाढल्याने प्रतिगुंठा १४०० ते १६०० रुपयांवर बाजारभाव पोचला आहे.


उन्हाळ्यात मका, ऊस, वाढे, कडवळ या जनावरांच्या चाऱ्यांना सध्या चांगली मागणी आहे. मागणी वाढल्याने दरही वाढू लागले आहेत. कडवळ व मका सध्या दौंड मंडलमध्ये ८०९
व्हेक्टरमध्ये मकाचे पीक घेण्यात आले आहे.
मका व कडवळ यांचा चारा दुभत्या जनावरांना पोषक असल्याने शेतकरी त्याची खरेदी करतात. कडवळापासून शेतकरी त्यांची वैरण तयार करतात. तर मकापासून शेतकरी मशिनच्या साहयाने मुरघास करण्यात येतो. पावसाळ्यात त्याचा जनावरांच्या खाद्यासाठी वापर करतात.
तालुक्यात काही शेतकऱ्यांनी मागील महिन्यात मकाची पेरणी केली आहे. परंतु मकावर सध्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. कडवळ पिकाची वाफ चालू असल्याने पेरणीला वेग आला आहे.


मकापासून शेतकऱ्यांना होणारे फायदे :
* मकामुळे जनावरांच्या दुधात वाढ होते.
* जणावरांसाठी पौष्टिक मुरघास तयार होतो.
* मकाची कणसे ओली विकता येतात.
* बाजार नसल्यास वाळून बी तयार होते.
* मकापासून भाकरीही तयार होते.


कडवळापासून होणारे फायदे :
* जनावरांना हिरवा कसदार चारा मिळतो.
* कडवळापासून वैरण तयार होते.
* बिगर हंगामी ज्वारीचे उत्पादन होते.

मकावर लष्कराळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात अलीकडच्या काळात वाढलेला आहे याच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचा वापर प्रभावशाली दिसतो. अळी पडल्याच्या सुरुवातीच्या काळात इमामेक्टीन बेंझोएट दहा ग्रॅम वीस लिटर पंपाला व सोबत निम ऑइल २० मिली प्रतिपंप अशी फवारणी घ्यावी. थायमेथोक्झाम (१२.६%) + लॅमडा सायहॅलोथ्रीन (९.५% झेडसी) ८० मिलि. प्रति एकर घावे.
- शिवाजी कदम, कृषी सहायक देऊळगाव राजे


जनावरांना चाऱ्यासाठी सध्या मकाची मोठी मागणी आहे. सध्या उन्हाळ्यामुळे मकाला १५०० ते १६०० रुपये प्रतिगुंठा बाजारभाव मिळत आहे. यामुळे मका पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
- पंकज बुह्राडे, प्रगतशील मका उत्पादक शेतकरी देऊळगाव राजे

00435

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Violence Ambedkar Jayanti : इचलकरंजीत आंबडेकर जयंतीला दगडफेक, पोलिस कॉन्स्टेबल जखमी; जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय

Latest Marathi News Live Update: व्यावसायिकाच्या खूनप्रकरणी दोघांना अटक

Latur News: मरणानंतरही संपेनात ‘मरणयातना’; निलंगा तालुक्यात स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर, अनेक गावांमध्ये गैरसोय

Organ Donation Story: सासूने दिले जावयाला जीवनदान; रक्ताच्या नात्यांनी साथ सोडली, किडनी दानातून उभा केला संसाराचा आधार!

Swami Samarth Punyatithi 2026: स्वामींच्या 'या' शेवटच्या शब्दांचा आजही लाखो भक्तांना आधार; संकटांवर मात करण्याचा मिळतो आत्मविश्वास

SCROLL FOR NEXT