देऊळगाव राजे, ता. १० : ‘‘ऊस पिकामध्ये शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन व एआय तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात अवलंब करावा. यामुळे खर्चात बचत होऊन उत्पादनात वाढ होईल,’’असे मत ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी व्यक्त केले.
देऊळगाव राजे (ता. दौंड) येथे ॲग्रिकल्चरल अँड डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित कृषी विज्ञान केंद्र बारामती व कृषी विभाग महाराष्ट्र शासन आत्मा अंतर्गत आयोजित केलेल्या रब्बी पूर्व पीक नियोजन अभियान कार्यक्रमामध्ये पवार बोलत होते.
यावेळी ट्रस्टचे शास्त्रज्ञ संतोष करंजे यांनी कांदा, हरभरा, गहू व उडीद या पिकांबाबत मार्गदर्शन केले. मंडल कृषी अधिकारी उमेश पवार यांनी कृषी विभागातील विविध योजनेबाबत माहिती दिली. उपकृषी अधिकारी शीतल मगर यांनी महाकृषी विस्तार व एआय ॲपबाबत सांगितले.
कार्यक्रमाला तालुका सहाय्य्क तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रूपनवर, सहाय्यक कृषी अधिकारी रवींद्र तापकिरे, कृषीसेवक तेजल कदम, ऋतुजा भालेराव, तुकाराम अवचर, संदीप नय्यर, अप्पासाहेब खेडकर, प्रशांत वाबळे, किरण गिरमकर, पंकज बुऱ्हाडे, शिवाजी होलम, हरिभाऊ अवचर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सहाय्यक कृषिअधिकारी शिवाजी कदम यांनी केले.
00664