दावडी, ता. २० : दावडी (ता. खेड) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मर्दानी खेळ व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. गावातील चौकात सकाळी शिवज्योत आगमन, छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. ग्रामस्थ, युवक मंडळे, महिला बचत गट तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवात सहभाग नोंदविला.
सकाळी आठ वाजता शिवज्योत आगमन, मिरवणूक, शिव जन्मोत्सव, पाळणा आरती, त्यानंतर सकाळी १० वाजता मर्दानी खेळ व प्राथमिक शाळेतील मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक पोशाखातील विद्यार्थ्यांनी लेझीम, मर्दानी खेळ, पारंपरिक वेषभूषा व संगीत कार्यक्रम झाले. शालेय विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित नाटिका, पोवाडे आणि देशभक्तिपर गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर शिवभोजणाचे आयोजन केले होते.
00135
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.