दावडी, ता. २२ : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व राज्य शाळा मानक प्राधिकरण कक्ष यांच्या वतीने शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQAAF) या अंतर्गत राज्यातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांचे मूल्यांकन करण्यात आले. या मूल्यांकनामध्ये खेड तालुक्यातील आठ शाळांना अ+ श्रेणी मिळाली असून, यामध्ये दावडी (ता. खेड) येथील आमराळवाडी शाळेला अ+ श्रेणी प्राप्त झाली आहे.
शाळेतील अद्ययावत भौतिक सुविधा, डिजिटल साधनांचा प्रभावी वापर, शिक्षकांची निष्ठा व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग हे या यशामागील प्रमुख घटक ठरले. मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांच्या एकत्रित प्रयत्नांचे हे फळ असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी शाळेच्या गुणवत्ता वृद्धीसाठी सातत्याने सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थ, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांचे आभार मानण्यात आले. या यशामुळे शाळेला भविष्यात अधिक प्रगतीची प्रेरणा मिळणार असून, गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा संकल्प अधिक दृढ झाला आहे.
शाळेच्या वतीने शाळेच्या भौतिक सुविधा विद्यार्थी गुणवत्ता व शाळेची सर्वांगीण प्रगती याकरिता शाळेला पाठबळ देणाऱ्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेंद्र शिंदे उपाध्यक्ष विशाल आमराळे, शाळा व्यवस्थापन समिती सर्व सदस्य तसेच, मुख्याध्यापक रविकिरण भोसले व उपशिक्षिका मनीषा थिटे यांचे अभिनंदन करण्यात आले. या यशाबद्दल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह शिंदे, पंचायत समिती सदस्या विद्या मोहिते, शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले, विस्ताराधिकारी वामन सूर्यवंशी, केंद्रप्रमुख अलका जाधव यांनी शाळेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
00137
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.