पुणे

जमिनीच्या ताब्यासाठी जमाव जमवून मारहाण

CD

दावडी, ता. ३० : खेड तालुक्यातील वाफगाव येथे न्यायप्रविष्ट असलेल्या जमिनीवर बेकायदा ताबा मिळवण्याच्या प्रयत्नातून जमाव जमवून मारहाण व दमदाटी केल्याप्रकरणी भोसरी (ता. हवेली) येथील तिघांसह २० ते २२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी ऋषिकेश साहेबराव सुर्वे (रा, वाफगाव- मांदळेवस्ती, ता. खेड) यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नवनाथ बबन गवळी, नारायण बबन गवळी, मच्छिंद्र बबन गवळी सर्व राहणार भोसरी, (ता. हवेली) तसेच ८ ते १० अज्ञात पुरुष व १० ते १२ महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तसेच, आरोपींनी शेतातील पिकांचे नुकसान करून अनधिकृतपणे खड्डे खोदत लोखंडी खांब उभारण्याचा प्रयत्न केला. तसेच, पोल्ट्री व्यवसायासाठी वापरात असलेले स्टील साहित्य व कुट्टी मशीन चोरी केली. या पूर्वीही २०२३ व १२ ऑक्टोबर २०२५ रोजी या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान, आरोपी पक्षातील निकिता दामोदर चौरे (सध्या रा. केसनंद फाटा, वाघोली, ता. हवेली; मूळ रा. कपिलवस्तीनगर, यवतमाळ) यांनीही खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. D26A00229

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT