दावडी, ता. ३१ : पूर (ता. खेड) येथील लक्ष्मीमाता यात्रेत १८० बैलगाड्यांच्या सहभागाने रंगलेल्या भव्य शर्यतीत दादाभाऊ घाडघे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर संदीप गावडे व विनायक गोसावी यांना ‘घाटाचा राजा’ बहुमान मिळाला. यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन केले होते.
यात्रेच्या मुख्य दिवशी सकाळी ग्रामदेवीचा अभिषेक व महापूजा पार पडली. त्यानंतर सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत बैलगाडा शर्यती रंगल्या. या शर्यतीसाठी दुचाकी व २ लाख ७० हजार रुपयांची रोख बक्षीसे देण्यात आली. रात्री देवीचा छबीना व पालखी मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह शिंदे, दिप्ती भोगाडे, सभापती विद्या मोहिते व राजेंद्र पचारणे आदी उपस्थित होते.
शर्यतीदरम्यान घाटात गाडे सोडण्यावरून काही काळ किरकोळ वाद झाला. मात्र, ग्रामस्थांच्या मध्यस्थीने कार्यक्रम सुरळीत पार पडला. रात्री ‘यंग स्टार ऑर्केस्ट्रा’ने यात्रेची सांगता झाली, तर मंगळवारी (ता. ३१) सायंकाळी महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम झाला. यात्रेच्या यशस्वीतेसाठी संदीप गावडे, राहुल गावडे, अभिषेक गावडे, किशोर सावंत व गजानन क्षीरसागर यांनी परिश्रम घेतले.
00231
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.