घोडेगाव, ता. १९ : घोडेगाव (ता. आंबेगाव ) येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिवजयंती सोहळा उत्साहात पार पडला. शाळेतील सर्व विद्यार्थी पारंपारिक वेशभूषेत उपस्थित होते. विद्यार्थ्यांसोबतच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही पारंपारिक वेशभूषा परिधान केली होती. शाळेतील वातावरण शिवमय झाले होते. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांची पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी आदित्य काळे या विद्यार्थ्याने शिवाजी महाराजांबद्दल माहिती दिली. छत्रपती शिवरायांचा इतिहास शिवपूर्व काळापासून ते शिवरायांच्या राज्याभिषेकापर्यंतचा नयनरम्य नृत्य आविष्कार ‘येल्लो हाऊस’ने सादर केला. विद्यालयाचे संगीत विशारद टी. पी. तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्णव इंगवले आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सुंदर पोवाडा सादर केला.
या सोहळ्यामध्ये सुरेश काळे, खजिनदार सोमनाथ काळे, प्रशांत काळे, राजेश काळे, बाळासाहेब काळे, प्राचार्य मेरी फ्लोरा डिसूझा उपस्थित होते. शाळेच्या उपप्राचार्या रेखा आवारी यांनी विद्यार्थ्यांना शिवरायांचा इतिहास संबोधित केला.
यशवंत गेजगे व समृद्धी बारवे यांनी सूत्रसंचालन केले. तेजश्री यंदे यांनी आभार मानले. जयंतीच्या सर्व कार्यक्रमाचे नियोजन करण्याचे शिक्षक सागर लोखंडे, प्रज्ञा घोडेकर, बबिता राऊत, तेजश्री यंदे, वर्षा पवार यांनी केले. तसेच विद्यालयाचे कला शिक्षक समीर मुजावर यांनी ऐतिहासिक देखावा साकारला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.