पुणे

नीरा येथे विद्यार्थिनींना लोकशाहीचे धडे

CD

गुळुंचे, ता. १४ ः नीरा (ता. पुरंदर) येथील सौ. लीलावती रिखवलाल शहा कन्या विद्यालयात विद्यार्थ्‍यांना मतदान प्रक्रिया माहिती व्हावी, यासाठी शालेय विद्यार्थी प्रतिनिधी निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यात आल्याची माहिती विद्यालयाच्या प्राचार्या निर्मला माने यांनी दिली .
यावेळी नववीमध्ये प्रथम आलेल्या तीन विद्यार्थिनी अनुक्रमे मानमोडे ईश्वरी, पवार हर्षदा, वावरे आदिती, वैभवी भुजबळ तसेच, एनएमएमएस परीक्षा शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी सांची प्रधान या विद्यार्थिनी विद्यालयाकडून उमेदवारीसाठी पात्र ठरल्या.
उमेदवारी जाहीर केल्यानंतर या उमेदवारांनी आपापले चिन्ह ठरविले. त्यानंतर विद्यार्थिनींना प्रचारासाठी दोन दिवस देण्यात आले. तसेच, एक दिवस प्रचार बंदी ठेवण्यात आली. त्यानंतर विद्यालयांमध्ये लोकशाही पद्धतीने मतदान घेण्यात आले. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य अनिल धुमाळ आणि प्राथमिक शाळा नीरा नं. १ च्या मुख्याध्यापिका संगीता बालगुडे यांच्या हस्ते मशिनचे पूजन करण्यात आले. सर्व विद्यार्थिनींनी इच्छुक उमेदवाराला मतदान केले. त्यानंतर मतमोजणी करून निकाल जाहीर केला. यावेळी मान्यवर ग्रामस्थ अश्विनी चव्हाण उपस्थित होत्या.
शालेय विद्यार्थी प्रतिनिधी मुख्यमंत्री म्हणून वैभवी भुजबळ १३३ मताने विजयी झाली, तर उपमुख्यमंत्री ईश्वरी मानमोडे ही १०३ मतांसह उपविजेती ठरली. विद्यालयाच्या पर्यवेक्षिका अनुराधा उरमोडे यांनी विजेत्या उमेदवारांचे अभिनंदन केले.
संसदेचे अध्यक्ष म्हणून वैभवी भुजबळ, तर उपाध्यक्ष म्हणून ईश्वरी मानमोडे यांची निवड झाली.

विद्यार्थी संसदेमधील विद्यार्थिनींची नावे ः
राजवी पोकळे, राजगौरी टकले, अन्वी कुचेकर, खुशी वाघ, स्वरांजली हुलगे, श्रेया अधटराव, पूर्वा जाधव, आराध्या मोरे, प्राचीन प्रधान, शौर्या धायगुडे, आसावरी बोडरे, वैष्णवी देवाडिगा, राबिया मुलाणी, इशिका वावरे, स्वरा धुमाळ, संस्कृती सूर्यवंशी, कृपा जठार, सई जेधे, धनश्री जाधव, पूजा मोटे, काजल कुमारी, गायत्री माने, अर्पिता जाधव, विशाखा पंडित.

02004

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : देशात लोकशाहीवर हल्ला; ‘जनसुरक्षा’विरोधी संघर्ष समितीकडून मुंबईत निर्धार परिषद

Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीबाबत सोमवारी होणार सुनावणी

९८ वर्षाच्या आजीबाईंचेही ‘लाडकी बहिणी’साठी अर्ज! लाभ बंद होऊ नये म्हणून अपात्र लाडक्या बहिणींची नानातऱ्हेचे उत्तरे; अंगणवाडी सेविकांचे अनुभव, वाचा...

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

Eknath Shinde यांच्या बंगल्यावर मोठी खलबतं, भाजप प्रदेशाध्यक्षांच्या संपर्कात असणाऱ्या नगरसेवकांना तंबी, काय निर्णय घेणार?

SCROLL FOR NEXT