पुणे

शेतकऱ्यांना २१ कोटींची नुकसान भरपाई

CD

सासवड शहर, ता. २ : पुणे जिल्ह्यात गेल्या वर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे शेती पिके व फळ पिकांचे नुकसान झाले होते. त्यामध्ये ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या पुरंदरमधील शेतकऱ्यांना २१ कोटी २६ लाख ५७ हजार रुपये नुकसानभरपाई मिळाली आहे, अशी माहिती पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी दिली.
पुरंदरमध्ये १४६ बाधित गावातील २७ हजार ८४१ शेतकरी यांचा समावेश आहे. पुरंदरमधील ९ हजार ३३२.४० हेक्टर जमीन क्षेत्र यात समाविष्ट झाले आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्यातील ८५ हजार ४४५ शेतकऱ्यांना ७३ कोटी ६० लाख ३८ हजार रुपये नुकसानभरपाई ऑनलाइन पद्धतीने करण्याची कार्यवाही सुरू असून, सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे, असे माहिती निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी दिली आहे.
या व्यतिरिक्त जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शेती पिकाच्या नुकसानीसाठी ३ कोटी १४ लाख २१ हजार रुपये आणि शेतजमीन खरडून झालेल्या नुकसानीपोटी १३ लाख ६४ हजार इतकी रक्कम अदा करण्यात आली आहेत. पुणे जिल्ह्यात मार्च २०२३ मधील अतिवृष्टीमुळे ८४ गावातील १ हजार ४३४ शेतकऱ्यांची शेती बाधित झाली आहे एकूण ४०८.९४ क्षेत्र बाधित झाले असून शेती पिके व फळ पिकांच्या नुकसानीपोटी ७० लाख ७० हजार रुपये अनुदान मागणी केली आहे असेही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT