सासवड शहर, ता. १९ : वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने स्वर्गीय शिवाजी अप्पा पोमण यांच्या स्मरणार्थ आदर्श कार्यकर्ता पुरस्कार तसेच स्वर्गीय दत्तात्रेय कामठे यांच्या स्मरणार्थ आदर्श सरपंच पुरस्काराचे वितरण दरवर्षी करण्यात येते. सासवड (ता पुरंदर) येथे वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी पत्रकार परिषद घेऊन यंदाचा ‘आदर्श कार्यकर्ता’ हा पुरस्कार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व समर्थ नागरिक पतसंस्थेचे चेअरमन नीरा येथील राजेश वसंत चव्हाण यांना, तर स्वर्गीय दत्तात्रेय कामठे आदर्श सरपंच पुरस्कार हरगुडे येथील सरपंच भूषण रवींद्र ताकवले यांना दिला जाणार आहे दिला जाणार आहे असे जाहीर केले
हे पुरस्कार दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते बुधवारी २२ मे रोजी गुरुवर्य नारायण महाराज माध्यमिक विद्यालय हिवरे या ठिकाणी सकाळी १०:३० वाजता वितरित करण्यात येणार असल्याचे कामठे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी पुरस्कार निवड समितीचे सदस्य व स्वर्गीय एकनाथ काका प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप, कुंभारवळणचे माजी सरपंच सचिन पठारे, किसान मोर्चाचे अध्यक्ष संदीप देवकर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.