सासवड शहर, ता. १४ : गुंजवणी पुरंदर तालुक्यातील महत्त्वाचा प्रकल्प आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठीच्या आहे. त्यातून सासवड शहराच्या पिण्यासाठीच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता गुंजवणी योजनेतून ०.४३ टीएमसी पाणी आरक्षित ठेवले आहे, अशी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गिरमे यांनी सांगितले.
सासवड (ता पुरंदर) येथे दिलीप गिरमे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, पाण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत योजनेचा पाठपुरावा केला तर पाण्याचा प्रश्न सुटेल, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीरा देवधर प्रकल्प यांनी गिरमे यांना पत्रामध्ये लेखी दिले आहे.
ग्रामीण भागात असणाऱ्या अनेक योजना कऱ्हा नदीवरून आहेत. यामध्ये हेच पाणी सोमर्डी च्या परिसरामध्ये सोडले तर तालुक्यातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे असे देखील गिरमे यांनी यावेळी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.